Join us

जया बच्चन यांचा सल्ला अन् ठेवलं इंडस्ट्रीत पाऊल! ५२ व्या वर्षी घेतला संन्यास, अंडरवर्ल्डमुळे संपलं तिचं करिअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 18:49 IST

५२ व्या वर्षी घेतला संन्यास,अंडरवर्ल्डमुळे संपलं तिचं करिअर, कोण आहे ती?

Bollywood Actress: अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना हिंदी चित्रपटसृष्टीतही स्थिरावणाऱ्या काही मोजक्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे ममता कुलकर्णी. 'आशिक आवारा', 'करण-अर्जून',  'वक्त हमारा है' या चित्रपटांमुळे ममता आजही ओळखळी जाते. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या या अभिनेत्रीने इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये स्थान मिळवलं होतं. मात्र, अंडरवर्ल्डसोबत तिचं नाव जोडलं गेलं आणि ममता कुलकर्णीच्या करिअरला उतरती कळा लागली. सिनेपत्रकार, लेखिका अनिता पाध्ये यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ममता कुलकर्णींच्या करिअरबद्दल भाष्य केलं आहे. 

अलिकडेच लेखिका अनिता पाध्ये यांनी लोकमत फिल्मीसोबत संवाद साधला. या मुलाखतीमध्ये त्या म्हणाल्या, "ममता कुलकर्णी ही खूप चांगली मुलगी होती.माझी आणि तिची काही ओळख नव्हती. इंडस्ट्रीत डेब्यू केल्यानंतर तिची मुलाखत मी घेतली होती. ममताचं या फिल्डमध्ये कोणी नव्हतं. एकदा जुहूमध्ये ब्यूटी पार्लरमध्ये ती गेली होती तेव्हा तिथे तिला जया बच्चन होत्या. तेव्हा तिला पाहिल्यानंतर जया बच्चन यांनी तिला तू फिल्म्समध्ये काम का करत नाहीस असा सल्ला दिला होता. तू दिसायला खूप सुंदर  आहेस, असं त्या तिला म्हणाल्या होत्या.

ममता मागे राहिली कारणं...

पुढे त्या म्हणाल्या, "ममता एक चांगली अभिनेत्री होतीच शिवाय ती उत्तम डान्सर देखील होती. ती जेव्हा करण अर्जून मध्ये काम करत होती तेव्हा इंडस्ट्रीतील गटबाजीचा फटका तिला बसला. नंतर त्याच्यामध्ये काजोलचा रोल कमी होता. तेव्हा काजोल आणि राकेश रोशन यांच्यात वाद झाला होता. या गटबाजीचा तिला फटका बसला.बाहेर जाऊन तिच्याबद्दल गैरसमज पसवरण्यात आले. तिने आमिर खानसोबतही काम केलं आहे. त्यानंतर तिचा अंडरवर्ल्डचा ट्रॅक सुरु झाला. त्या सगळ्यामध्ये ती वाहवत गेली. या इंडस्ट्रीत एकदा तुमचं नाव खराब झालं की तुम्ही बाद होता. या सगळ्यात तिचाच दोष आहे."असा खुलासा अनिता पाध्ये यांनी केला. 

टॅग्स :ममता कुलकर्णीबॉलिवूडसेलिब्रिटी