Join us
Daily Top 2Weekly Top 5

या सुप्रसिद्ध कॉमेडियनच्या पुतणीला मिळाला मोठा ब्रेक! बनली रिहानाच्या लग्झरी ब्रँडची मॉडेल!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 08:00 IST

होय, नाओमी जनुमाला हे तिचे नाव. १९ वर्षांच्या नाओमीला एका ग्लोबल ब्रँडसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.

ठळक मुद्देनाओमी ही जॉनी लिव्हरचा लहान भाऊ जिम्मीची मुलगी आहे.

बॉलिवूडचा कॉमेडी स्टार जॉनी लिव्हरच्या कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवले. पण आज आम्ही जॉनीबद्दल नाही तर त्याच्या पुतणीबद्दल सांगणार आहोत. होय, नाओमी जनुमाला हे तिचे नाव. १९ वर्षांच्या नाओमीला एका ग्लोबल ब्रँडसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. जगप्रसिद्ध पॉप स्टार रिहानाचा नवीन लक्झरी ब्रँड Fenty Beauty  सध्या जबरदस्त चर्चेत आहेत. नुकतेच सोनम कपूरला या ब्रँडच्या कपड्यांमध्ये पाहिले गेले होते. नाओमी याच ब्रँडचा चेहरा बनली आहे.

Fenty Beauty च्या ब्रँड कॅम्पेनचा भाग बनलेली नाओमी सध्या इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. नाओमीने तीन वर्षांपूर्वी मॉडेलिंगची सुरुवात केली होती. केवळ तीनच वर्षांत नाओमीने मोठी मजल मारली आहे. नाओमी केवळ Fenty Beautyचा कॅम्पेनचा भाग नाही तर तिचे फोटो खुद्द रिहानाने क्लिक केले आहेत.

रिहानाने स्वत:चा नाओमीची या कॅम्पेनसाठी निवड केली. या फोटोशूटचा एक बिहाईन्ड द सीन व्हिडीओ नाओमीने शेअर केला आहे. यात ती रिहानाला पोज देताना दिसतेय. रिहानासोबतचे काही फोटोही तिने शेअर केले आहेत.

अलीकडे एका मुलाखतीत नाओमीने रिहानासोबतचा अनुभव सांगितला होता. ‘मी पहिल्यांदा तिला भेटले. आम्ही एकमेकींना प्रेमाने मिठी मारली. तू कुठली, असे तिने मला विचारले.यावर मी भारतातली असे मी म्हणाले. मी भारतीय आहे, हे ऐकून रिहानाला कमालीचा आनंद झाला. मला तुच हवी होती. तू खूप सुंदर आहेत, असे रिहाना म्हणाली. ती माझ्याबद्दल असे बोलली, यावर अद्यापही मला विश्वास होत नाही,’असे तिने सांगितले होते.

नाओमी ही जॉनी लिव्हरचा लहान भाऊ जिम्मीची मुलगी आहे. मुंबईत जन्मलेली आणि शिकलेली नाओमी सध्या बर्लिनमध्ये शिफ्ट झाली आहे. अशा अनेक सुप्रसिद्ध ब्रँडसाठी ती रॅम्प वॉक करताना दिसली आहे.

टॅग्स :जॉनी लिव्हर