Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणबीर नव्हे इम्तियाज अली यांना 'या' सुपरस्टारला सोबत घेऊन बनवायचा होता 'रॉकस्टार', कुठे बिनसलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 13:55 IST

रणबीर आधी 'या' अभिनेत्याला मिळालेली रॉकस्टारची ऑफर, मग 'अशी' झाली कास्टिंग

Rockstar Movie: रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना प्रेमाची नव्याने ओळख करून देणाऱ्या दिग्दर्शकापैकी एक नाव म्हणजे  इम्तियाज अली. २०११ साली प्रदर्शित झालेला रॉकस्टार हा त्यांच्या कारकिर्दीतील  सर्वात्तम आणि सर्वात जास्त गाजलेला चित्रपट आहे. रणबीरचं यातलं पात्र लोकप्रिय रॉक सिंगर, कवि आणि गीतकार जीम मॉरिसन यांच्यापासून प्रेरित होतं. एका गायकाचा संघर्ष तसेच त्याला एका प्रेम कहाणीची जोड हे समीकरण लोकांना प्रचंड भावलं होतं.दरम्यान, या चित्रपटात रणबीर कपूरसह अभिनेत्री नर्गिस फाखरी देखील मु्ख्य भूमिकेत होती. पण तुम्हाला माहित आहे का? इम्तियाज अली यांनी सुरुवातीला या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी रणबीरला नव्हे, तर दुसऱ्याच अभिनेत्याची निवड केली होती.

अलिकडेच लक्ष महेश्वरी यांना दिलेल्या मुलाखतीत इम्तियाज अली यांनी 'रॉकस्टार'च्या कास्टिंगचा किस्सा शेअर केला आहे. दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी सांगितलं, मी 'सोचा ना था' या चित्रपटावर काम करत होतो आणि त्याच वेळी मी 'रॉकस्टार'ची कथा लिहिली. त्यावेळी मुख्य अभिनेत्यासाठी  पहिली पसंती जॉन अब्राहम होता. त्यांना खात्री होती की या भूमिकेसाठी तोच सर्वात योग्य अभिनेता ठरेल.

मग इम्तियाज म्हणाले, ते एकदा रणवीरला भेटले. त्यावेळी रणवीर अभिनय करत नव्हता. त्यानंतर त्यांची चांगली मैत्री झाली आणि त्यांनी कधीतरी एकत्र चित्रपट बनवण्याचं ठरवलं. त्याचवेळी, इम्तियाज यांनी त्याला आपल्या काही पटकथा वाचून दाखवल्या.दरम्यान, रणबीरने स्वतः इम्तियाज यांना विचारलं, "त्या 'रॉकस्टार' कथेबद्दल काय वाटतं?" त्याचं ते बोलणं ऐकून इम्तियाज यांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, "जर मी तो चित्रपट बनवला, तर तू त्यात अभिनय करशील का?" तेव्हा रणबीरने लगेच होकार दिला. अशा पद्धतीने रॉकस्टार बनवण्यात आला. असं इम्तियाज अली यांनी सांगितलं.  

असा शूट झालेला चित्रपट...

मिडिया रिपोर्टनुसार, रॉकस्टार हा चित्रपट उलटा म्हणजेच शेवटाकडून सुरुवातीकडे असा चित्रित केला गेला आहे. त्यामागील कारण म्हणजे रणबीरच्या हेअर स्टाइलमध्ये बदल नको हवे होते म्हणून त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं.

English
हिंदी सारांश
Web Title : 'Rockstar': Imtiaz Ali initially wanted John Abraham, not Ranbir

Web Summary : Imtiaz Ali initially envisioned John Abraham for 'Rockstar,' but Ranbir Kapoor's enthusiasm changed his mind. The movie was filmed unconventionally, from end to beginning to maintain Ranbir's hairstyle.
टॅग्स :रणबीर कपूरजॉन अब्राहमबॉलिवूडसिनेमा