Join us
Daily Top 2Weekly Top 5

जॉन अब्राहम-शर्वरीचा 'वेदा' सिनेमा OTT रिलीजसाठी सज्ज! या दिवशी, या ठिकाणी पाहता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 15:39 IST

जॉन अब्राहम-शर्वरी वाघ या दोघांचा वेदा सिनेमा ओटीटी रिलीजसाठी सज्ज आहे (vedaa)

१५ ऑगस्ट २०२४ ला बॉक्स ऑफिसवर तीन सिनेमे रिलीज झाले. 'स्त्री २', 'खेल खेल में' आणि 'वेदा'. यापैकी 'स्त्री २' सुपरडुपरहिट झाला. तर दुसरीकडे 'वेदा' आणि 'खेल खेल में' या दोन सिनेमांना हवं तितकं यश मिळालं नाही. जॉन अब्राहम-शर्वरी वाघचा 'वेदा' सिनेमा वेगळ्या कथानकामुळे चर्चेत राहिला. पण या सिनेमालाही हवं तितकं यश मिळालं नाही. अखेर थिएटरमध्ये कमी प्रतिसाद मिळालेला 'वेदा' सिनेमा ओटीटी रिलीजसाठी सज्ज आहे.

या दिवशी या ठिकाणी 'वेदा' होणार रिलीज

खऱ्या घटनांवर आधारीत 'वेदा' सिनेमा १५ ऑगस्टला रिलीज झाला. थिएटरमध्ये रिलीज होऊन आठ आठवडे उलटले नाहीच तो 'वेदा' आता ओटीटी रिलीजसाठी सज्ज आहे. रिपोर्ट्सनुसार 'वेदा' ऑक्टोबर महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात झी५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज  होणार आहे. त्यामुळे ज्यांना थिएटरमध्ये 'वेदा' पाहता आला नाही त्यांना आता घरबसल्या 'वेदा'चा अनुभव घेता येणार आहे.

'वेदा' सिनेमाविषयी थोडंसं...

'वेदा'च्या निमित्ताने शर्वरी-जॉन यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केलं. या दोघांशिवाय अभिषेक बॅनर्जी सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत दिसतोय. याशिवाय ज्येष्ठ अभिनेते आशिष विद्यार्थी, तमन्ना भाटिया सुद्धा सिनेमात विशेष भूमिकेत पाहायला मिळत आहेत. 'वेदा' सिनेमाचं दिग्दर्शन निखिल अडवाणी यांनी केलं आहे. हा सिनेमा १५ ऑगस्ट २०२४ ला सिनेमागृहात रिलीज झाला. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ५० कोटींहून अधिकची कमाई केली

टॅग्स :जॉन अब्राहमबॉलिवूड