Join us

देशात अल्पसंख्याक असुरक्षित आहेत? या प्रश्नावर जॉन अब्राहमने मांडलं परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 11:07 IST

अभिनेता जॉन अब्राहम सध्या त्याचा चित्रपट 'द डिप्लोमॅट'मुळे चर्चेत आहे.

John Abraham:  बॉलिवूडचा हॅंडसम हंक म्हणून ओळखला जाणारा हरहुन्नरी अभिनेता म्हणजे जॉन अब्राहम (John Abraham). मॉडेलिंग क्षेत्रात करिअयर करत असताना अभिनेत्याने आपली पाऊले अभिनय क्षेत्राकडे वळवली. नायकच नाही अनेक खलनायिकी भूमिका साकारून अभिनेत्याने बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वत: चं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. अनेक विविध धाटणीच्या भूमिका त्याने उत्कृष्टरित्या निभावल्या आहेत.  अल्पसंख्याक समुदायातील असलेल्या जॉनचे फक्त भारतात नाही तर जगभराच चाहते आहेत. अलिकडेच एका मुलाखतीमध्ये जॉनने देशात अल्पसंख्याक समुदायाच्या परिस्थितीवर भाष्य केलं. 

जॉन अब्राहमने देशातील अल्पसंख्याकांच्या परिस्थितीबद्दल 'टाईम्स नाऊ' बोलताना म्हटलं,  "मी अल्पसंख्याक समूदयातून येतो.  माझी आई झोरोस्ट्रियन आहे. माझे वडील सीरियन ख्रिश्चन आहेत. माझ्या देशात मला कधीही इतके सुरक्षित वाटले नाही. मला माझा देश आवडतो आणि मला इथे खूप सुरक्षित वाटते. मला भारतीय असल्याचा अभिमान आहे".

 जॉनच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याचा १४ मार्च रोजी  'द डिप्लोमॅट' थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. या चित्रपटात जॉनने भारतीय राजदूत जेपी सिंग यांची भूमिका साकारली आहे. शिवम नायर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट चांगली कमाई करतोय.  

टॅग्स :जॉन अब्राहमबॉलिवूड