Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: नेहमी पापाराझींवर रागावणाऱ्या जया बच्चन यांच्या 'या' कृतीने जिंकली सर्वांची मनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 15:23 IST

कायम रागात असणाऱ्या जया बच्चन यांचा वेगळाच अंदाज दिसुन आला. व्हायरल व्हिडीओत अनेकांनी कमेंट केली आहे (jaya bachchan)

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे जया बच्चन. जया बच्चन यांना आपण गेली अनेक दशकं विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहत आहोत. गेल्या वर्षी २०२३ मध्ये जया यांचा सिनेमा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चांगलाच गाजला. जया नेहमी मीडियासमोर रागावताना दिसतात. पण जया यांचा नुकताच एक व्हिडीओ समोर आलाय. यात त्यांच्या कृतीने सर्वांचं मन जिंकलंय.  

जया यांच्या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की, जया बच्चन खूप चांगल्या मूडमध्ये आहेत आणि पापाराझींसोबत हशामस्करी करत आहेत. यावेळी पोज देताना जया बच्चन म्हणाल्या, "बघा, आज मी हसतेय." जया बच्चन यांचा हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होतोय. जया यांचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्य वाटतंय. नेहमी मीडियावर रागावणाऱ्या जया यांचा हा चांगला मूड बघून सर्वांनाच आश्चर्य वाटलं.

जया बच्चन गेली अनेक वर्ष बॉलिवूडमध्ये कार्यरत आहेत. जया यांचे 'कोशिश', 'सिलसिला', 'परिचय', 'अभिमान', 'बावर्ची', 'शोले', 'कभी खुशी कभी गम', 'गुड्डी', 'कल हो ना हो' असे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या आवडीचे  आहेत. २०२३ मध्ये जया बच्चन  यांची खास भूमिका असलेला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमा चांगलाच गाजला. जया बच्चन अलीकडेच त्यांची नात नव्याच्या पॉडकास्टमध्येही दिसल्या.

टॅग्स :जया बच्चनअमिताभ बच्चनअभिषेक बच्चन