Join us

रणबीर कपूरबरोबर इंटिमेट सीन दिल्यामुळे ऐश्वर्यावर नाराज होत्या जया बच्चन? म्हणाल्या- लाज नावाची गोष्ट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 14:05 IST

रणबीरबरोबर इंटिमेट सीन दिल्यामुळे ऐश्वर्यावर जया बच्चन नाराज असल्याच्याही चर्चा होत्या. 

गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंबीय चर्चेत आहे. बच्चन कुटुंबात सासू सुनेत बिनसल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. जया बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यात खटके उडत असल्याच्याही चर्चा आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा बॉलिवूडच्या या सासू सुनेने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांच्यातील वादादरम्यानच जया बच्चन यांची जुनी मुलाखत व्हायरल झाली आहे. यामध्ये त्या ऐश्वर्याबद्दल बोलत आहेत. 

ऐश्वर्या राय बच्चनने २००७ साली अभिषेक बच्चनबरोबर लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर ४ वर्षांनी ऐश्वर्याने आराध्याला जन्म दिला. आई झाल्यानंतर ऐश्वर्याने करिअरमधून काही काळ ब्रेक घेतला होता. २०१६ साली तिने करण जोहरच्या 'ए दिल है मुश्किल' या सिनेमातून कमबॅक केलं होतं. या सिनेमात तिने वयाने छोट्या असलेल्या रणबीर कपूरबरोबर काही इंटिमेट सीन दिले होते. त्याची प्रचंड चर्चा रंगली होती. इंटिमेट सीन दिल्यामुळे ऐश्वर्यावर जया बच्चन नाराज असल्याच्याही चर्चा होत्या. 

'ए दिल है मुश्किल' सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा जया बच्चन म्हणाल्या होत्या की, "पूर्वी दिग्दर्शक कलाकृती निर्माण करायचे. पण, आज हा एक बिझनेस झाला आहे. आणि सगळ्या गोष्टी नंबर्सच्या अवतीभोवती फिरतात. आपल्या तोंडावर या गोष्टी फेकल्या जात आहेतत. आणि लोकाच्यांही ते लक्षात येत नाही. उघडपणे अशा गोष्टी दाखवणं स्मार्ट मानलं जात आहे. लाज नावाची गोष्टच राहिलेली नाही." जया बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन एकमेकींसोबत बोलत नसल्याचंही समोर आलं होतं. अनेक कार्यक्रमांमध्येही त्या दोघींनी एकमेकींपासून अंतर ठेवल्याचं दिसून आलं होतं. आराध्याच्या शाळेतील कार्यक्रमांमध्येही जया बच्चन सहभागी होताना दिसत नाहीत. 

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनजया बच्चनरणबीर कपूर