Join us

ऐश्वर्याचे रणबीरसोबतचे इंटिमेट सीन पाहून भडकल्या होत्या जया बच्चन, म्हणाल्या - लाज विकली वाटतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 08:00 IST

ऐश्वर्या राय बच्चन व रणबीर कपूरचे इंटिमेट सीन पाहून जया बच्चन यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. त्यांनी भर कार्यक्रमात सुनावली होती खरी खोटी

कोरोनाचे वाढते संकट पाहून देशात लॉकडाउन जाहीर केले आहे. त्यामुळे सगळेजण आपापल्या घरात कैद आहेत. सध्या लॉकडाउन चौथ्या टप्प्यात असून लोकांना घरातच थांबण्यास सांगितले आहे. अशात सोशल मीडियावर बॉलिवूडशी निगडीत बरेच जुने किस्से व्हायरल होताना दिसत आहेत. अशात ए दिल है मुश्कील चित्रपटाशी संबंधीत एक किस्सा खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटातील काही सीन पाहून जया बच्चन त्यांची सून व अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनवर खूप नाराज झाली होती. 

बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने 2016 साली ऐ दिल है मुश्किल चित्रपट रिलीज केला होता. या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन, रणबीर कपूर, अनुष्का शर्मा व फवाद खान मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली होती. जवळपास 59 कोटीच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने 220 कोटींची कमाई केली होती. 

या चित्रपटात ऐश्वर्याने तिच्यापेक्षा 9 वर्षे लहान असणाऱ्या रणबीर कपूरसोबत इंटिमेट सीन दिले होते. हा सिनेमा पाहिल्यानंतर ऐश्वर्याची सासू म्हणजेच जया बच्चन यांनी पब्लिकली ऐश्वर्याचं नाव न घेता लाज काही उरलीच नाही, असे म्हटलं होतं.

एका सिनेमाशी संबंधीत कार्यक्रमात जया बच्चन यांनी सांगितले होते की, आजकाल चित्रपटांमध्ये लाज वगैरे काही उरली नाही. पहिले दिग्दर्शक आपली कला सादर करायचे. आता त्यांच्यासाठी चित्रपट बिझनेस बनला आहे. ते त्याच्या आधारावर सिनेमे बनवितात. 

खरेतर करण जोहरने ऐश्वर्याला किसिंग सीन करायला देखील सांगितला होता. मात्र ऐश्वर्याने स्पष्ट नकार दिला होता. तिने अशा सीन मध्ये कम्फर्टेबल नसल्याचे सांगितले होते. चित्रपटाची डिमांड असल्यामुळे तिने इंटिमेट सीन दिले होते. या सीनमुळे बच्चन कुटुंब नाराज झाले होते.

बच्चन कुटुंबाने चित्रपटातील ऐश्वर्याचे इंटिमेट सीन काढून टाकण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. मात्र करण जोहर तयार झाला नव्हता. ऐ दिल है मुश्किल चित्रपटानंतर ऐश्वर्याला सासरी असे सीन करण्यासाठी मनाई केली आहे.

यापूर्वी ऐश्वर्याने धूम 2 सिनेमात हृतिक रोशनसोबत लिपलॉक केले होते. त्यावेळीदेखील बच्चन कुटुंब नाराज झाले होते. त्यावेळी ऐश्वर्या व अभिषेकची एगेंजमेंट झाली होती. त्यावेळी ऐश्वर्या पूर्णपणे सून झाली नव्हती.

 

टॅग्स :रणबीर कपूरऐश्वर्या राय बच्चनजया बच्चन