Join us

जया बच्चन घरातही चिडतात का? आईच्या रागीट स्वभावाबद्दल अभिषेक म्हणाला- माझी आई....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 15:09 IST

जया बच्चन अनेकदा पापाराझींना फटकारताना दिसल्या आहेत. त्याघरात देखील रागात असतात का? असा प्रश्न अनेकवेळा नेटकरी विचारत असतात.

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन  (Amitabh Bachchan)यांची पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन  (Jaya Bachchan) यांना पापाराझी फारसे आवडत नाहीत हे आता सर्वांनाच माहिती झालं आहे. फोटो काढताना त्या अनेकदा पापाराझींना फटकारताना दिसल्या आहेत. जया बच्चन यांचे असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जया बच्चन घरात देखील रागात असतात का? असा प्रश्न अनेकवेळा नेटकरी विचारत असतात. आता यावर अभिषेक बच्चनने आई जया बच्चन यांच्या खरा स्वभाव कसा आहे हे सांगितलं आहे.  एका मुलाखतीदरम्यान अभिषेक बच्चन याने आईच्या स्वभावा नेमका कसा आहे याबाबत सांगितलं आहे. माझी आई अजिबात कठोर नाही, ती प्रेमळ आहे. वडील कायम शूटिंगमध्ये बिझी असायचे तेव्हा आईने कधीच कोणतीच कमतरता भासू दिली नाही. ती एक आई आहे. असं अभिषेक म्हणाला. 

अभिषेक लहान असतात बिग बी अमिताभ बच्चन शूटिंगच्या निमित्ताने घराबाहेर असायचे किंवा रात्री उशीरा घरी यायचे.  त्यामुळे वडिलांपेक्षा आईचा सहवास त्याला जास्त लाभला आहे. अमिताभ बच्चन कामात व्यस्त असताना जय बच्चन यांनी अभिषेक आणि श्वेता यांचा सांभाळ केला.  

अभिषेकने आराध्या आणि जया बच्चन यांच्या नात्याबद्दल ही सांगितलं. दोघींमध्ये मैत्रीचं नातं आहे. पण जेव्हा आराध्या कोणत्या अडचणीत असते, तेव्हा सर्वात आधी तिला तिच्या आईची म्हणजे ऐश्वर्या हिची आठवण येते…’ असं देखील अभिषेक नुकताच झालेल्या मुलाखतीत म्हणाला.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर अभिषेक बच्चन सध्या त्याचा घूमर सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. १८ ऑगस्टला रिलीज होणार या चित्रपटात अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर यांच्याशिवाय शबाना आझमी देखील दिसणार आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन एका खास भूमिकेत दिसणार आहेत. 

टॅग्स :जया बच्चनअभिषेक बच्चन