Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरुखच्या 'जवान' मध्ये मराठी अभिनेत्रीची दिसली झलक, थेट किंग खानच्या सिनेमातून कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 15:14 IST

आमिर खानसोबतही केलंय काम

शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) 'जवान' (Jawan) सिनेमाचा प्रीव्ह्यू नुकताच रिलीज करण्यात आला. अ‍ॅक्शन आणि व्हीएफएक्स सिनेमाचं आकर्षण आहे. 'पठाण' नंतर शाहरुखला 'जवान' कडूनही अपेक्षा आहेत. तसंच साऊथचा प्रसिद्ध दिग्दर्शक अ‍ॅटलीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. सिनेमाच्या प्रीव्ह्यूमध्ये सर्वांचं लक्ष गेलं ते मराठमोळ्या अभिनेत्रीकडे. कोण आहे ती अभिनेत्री?

अ‍ॅटली दिग्दर्शित 'जवान' सिनेमात मोठी स्टारकास्ट आहे. शाहरुख खान, नयनतारा, विजय सेतुपती, प्रियामणि, सुनील ग्रोवर यांची भूमिका आहे. तर दीपिका पदुकोणचा स्पेशल अ‍ॅपिअरन्स आहे.  या दिग्गज स्टारकास्टमध्ये मराठी अभिनेत्रीही तितकीच भाव खाऊन जाणार आहे. ती म्हणजे अभिनेत्री गिरीजा ओक. अनेक दिवसांपासून गिरीजा रुपेरी पडद्यावरुन गायब होती. पण आता तिने थेट शाहरुख खानच्या सिनेमातूनच कमबॅक केले आहे. 'जवान' च्या प्रीव्ह्यूमध्ये तिची झलक दिसते. गिरीजाही सिनेमात अ‍ॅक्शन मोडमध्ये बघायला मिळणार आहे.

गिरीजाने काही दिवसांपूर्वीच 'जवान' चा फर्स्ट लुक शेअर केला होता. गिरीजा कुठे गायब आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. याचं उत्तर आता सर्वांनाच मिळालं आहे. गिरीजाने याआधी आमिर खानच्या 'तारे जमीन पर' सिनेमातही भूमिका साकारली होती.  गिरीजावर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होतोय. तसंच जवान साठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रिया बापट, सुव्रत जोशी, नेहा पेंडसे यांनी गिरीजाचं कौतुक केलं आहे. 

टॅग्स :गिरिजा ओकशाहरुख खानमराठी अभिनेताबॉलिवूड