Join us

जावेद अख्तरांचे एक्स अकाऊंट हॅक झाले; ऑलिम्पिकमधील भारतीय संघाबाबत ट्विट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 08:48 IST

ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंबाबत अख्तर यांच्या खात्यावरून पोस्ट करण्यात आली होती.

कशाचीही भीडभाड न ठेवता आपली मतं रोखठोक मांडणारे प्रसिद्ध लेखक आणि संगीतकार जावेद अख्तर यांचे सोशल मीडिया अकाऊंट एक्स हॅक झाले आहे. ऑलिंम्पिकवर रविवारी त्यांच्या या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आली होती. ती आपण केलीच नाही, असा दावा अख्तर यांनी केला आहे. 

अख्तर यांनी यासंबंधी पोस्ट करून माहिती दिली आहे. आपले अकाऊंट हॅक करण्यात आले होते, ऑलिम्पिकची पोस्ट मी केली नव्हती, असे अख्तर म्हणाले. जावेद अख्तर हे सध्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहेत. त्यांनी अनेक मुद्द्यांवर त्यांचे मत व्यक्त केले आहे. याच काळात त्यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले आहे. 

ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंबाबत अख्तर यांच्या खात्यावरून पोस्ट करण्यात आली होती. त्यात आक्षेपार्ह काही नव्हते, परंतू ती पोस्ट अख्तर यांनी केलेली नसल्याने खळबळ उडाली होती. हे काम हॅकर्सनी केल्याचे अख्तर यांनी म्हटले आहे. हे ट्विट आता हटविण्यात आले असून अख्तर यांनी ट्विटरकडे याची तक्रार केली आहे. अख्तर यांच्या चाहत्यांनी त्यांना पासवर्ड बदलण्याचा सल्ला दिला आहे. 

टॅग्स :जावेद अख्तरट्विटर