Join us

जान्हवीने खऱ्या अर्थाने केलं नववर्षाचं स्वागत, शिखर पहाडियासोबत घेतलं तिरुपतीचं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 16:33 IST

जान्हवी आणि शिखरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

बॉलिवूड अभिनेत्री आणि श्रीदेवीची लेक जान्हवी कपूरने (Janhavi Kapoor) खऱ्या अर्थाने नवीन वर्षाचं स्वागत केलं आहे. नुकतंच जान्हवीने तिरुपतीचं दर्शन घेतलं आहे. यावेळी तिच्यासोबत तिचा रुमर्ड बॉयफ्रेंड शिखर पहाडियाही (Shikhar Pahariya) होता. लिंकअपच्या चर्चांदरम्यान जान्हवीने शिखरसोबत देवदर्शन घेत नववर्षाचं स्वागत केलं. तसंच श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरातही तिने दर्शन घेतलं. जान्हवी आणि शिखरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

जान्हवीची देवावर मोठी श्रद्धा आहे. ती अनेकदा तिरुपती बालाजी, ओंकारेश्वर मंदिर, केदारनाथ येथे दर्शनाला गेली आहे. नुकतीच ती तिरुपतीला पोहोचली. यावेळी तिने पारंपरिक पद्धतीने गोल्डन रंगाची साडी नेसली होती. तसंच गळ्यात हार आणि कानात झुमके घातले होते. जान्हवी अशा ट्रेडिशनल लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तर शिखरनेही अंगावर उपरणं घेत धोती नेसली होती. दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

जान्हवीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या लूकमधील फोटो पोस्ट केलेत. यामध्ये तिच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद दिसून येत आहे. 'आता खऱ्या अर्थाने 2024 ची सुरुवात झाल्यासारखं वाटत आहे' असं कॅप्शन तिने दिलं आहे.

जान्हवीचा सनकिस्ड फोटो पाहून अनेकांनी कमेंट करत तिच्या सौंदर्याची तारीफ केली आहे. सूर्यप्रकाशात तिचं सौंदर्य आणखी खुललं आहे. जान्हवीने नुकतंच कॉफी विद करणमध्ये शिखरसोबतचं नातं कन्फर्म केलं. शिखर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. तो बिझनेसमन असून पोलो प्लेयरही आहे.

टॅग्स :जान्हवी कपूरबॉलिवूडतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटनववर्ष