Join us

जान्हवी कपूरचा कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा, अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकवरुन नजरच हटेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 09:28 IST

जान्हवी, ईशान खट्टरचा सिनेमा 'होमबाऊंड'चा प्रीमियर कान्समध्ये पार पडला. यावेळी जान्हवीसोबत ईशान खट्टरही रेड कार्पेटवर झळकला.

Janhvi Kapoor debut at Cannes: यंदा ७८ व्या कान्स चित्रपट महोत्सवाच्या रेड कार्पेटवर भारतीय सिनेसृष्टीतून अनेक कलाकारांनी पदार्पण केलं. अभिनेत्री कियारा अडवाणी, नितांशी गोयल यांचे लूक समोर आले होते. तर आता काल अभिनेत्री जान्हवी कपूरनेही (Janhvi Kapoor) कान्समध्ये डेब्यू केला. जान्हवीने गुलाबी रंगाचा कॉर्सेट परिधान केला होता ज्यात एकदम स्टायलिश दिसत होती. जान्हवीसोबत अभिनेता ईशान खट्टर, निर्माता करण जोहर यांचीही उपस्थिती होती.

जान्हवी कपूरचा आऊटफिट डिझायनर तरुण ताहिलियानीने डिझाईन केला होता. या माध्यमातून त्यांनी भारतीय रॉयल्टीची झलक दाखवली. गुलाबी रंगाच्या कॉर्सेटमध्ये जान्हवीने एन्ट्री केली.  कठीण डिझाईन आणि बनारस हस्तकला या आऊटफिटवर सादर केली आहे. गळ्यात मोत्याची ज्वेलरी आहे.  मिनिमल मेकअपमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. तिचे फ्रेंच रिव्हेरावरील फोटोही व्हायरल झाले आहेत. 

जान्हवी आणि ईशान खट्टरचा 'होमबाऊंड' सिनेमाचं कान्समध्ये प्रीमियर झालं. सिनेमात विशाल जेठवाचीही मुख्य भूमिका आहे. तिघांनीही सिनेमाच्या प्रीमियरसाठी कान्सच्या रेड कार्पेटवर हजेरी रावली. कान्सच्या प्रतिष्ठित 'अन सर्टेन रिगार्ड' सेक्शनमध्ये या सिनेमाचा प्रीमियर पार पडला. निर्माता करण जोहरने या सिनेमाची निर्मिती केली आहे. त्यामुळे तोही यंदा कान्समध्ये सहभागी झाला होता. 'होमबाऊंड' सिनेमाच्या टीमने रेड कार्पेटवर ग्रुप फोटोही काढले. यावेळी ईशान खट्टर जान्हवीची मदत करताना दिसला.

जान्हवी कपूरचा कान्समध्ये डेब्यू तिच्या मित्रपरिवारासाठी अभिमानाचा क्षण होता. तिला पाठिंबा देण्यासाठी बहीण खुशी कपूर, बॉयफ्रेंड शिखर पहाडिया आणि मित्र ओरी हे देखील पोहोचले होते. 

टॅग्स :जान्हवी कपूरकान्स फिल्म फेस्टिवलइशान खट्टरबॉलिवूड