Join us
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीच्या मांडीवर खेळणारी 'ही' चिमुकली आहे बॉलिवूडची ग्लॅमर क्वीन; तुम्ही ओळखलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 18:03 IST

पांढरा फ्रॉक घालून मोठ्या बहिणीच्या मांडीवर खेळणाऱ्या गोंडस मुलीचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पांढरा फ्रॉक घालून मोठ्या बहिणीच्या मांडीवर खेळणाऱ्या गोंडस मुलीचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. फोटोमध्ये दिसणार्‍या दोन्ही बहिणी मोठ्या होऊन बॉलिवूडच्या ग्लॅमरस क्वीन्स बनल्या आहेत. धाकटी मुलगी तिच्या बोल्ड लूकने लोकांना घायाळ करत आहे, तर मोठी बहीण नुकतीच एका मुलाची आई झाली आहे. अभिनेत्री सोनम कपूर आणि जान्हवी कपूरचा हा बालपणीचा फोटो आहे. जान्हवी सोनम कपूरच्या मांडीवर आहे.

अभिनेत्री श्रीदेवी आणि चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर आज तिच्या अभिनयाने आणि शैलीने लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते. जेव्हा जेव्हा जान्हवी सोशल मीडियावर तिचे फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करते तेव्हा ते तुफान व्हायरल होतात. तिचे लाखो चाहते आहेत. 

जान्हवी कपूरने करण जोहरच्या 'धडक' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, तेव्हापासून ही अभिनेत्री एकामागोमाग हिट चित्रपटांमध्ये काम करत आहे. आता लवकरच जान्हवी कपूर 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटात दिसणार आहे.

अनिल कपूरची मुलगी आणि अभिनेत्री सोनम कपूरने नुकताच जान्हवी कपूरच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर तिचा बालपणीचा फोटो पोस्ट केला आहे. सोनम कपूर आणि जान्हवी कपूर चुलत बहिणी आहेत. या फोटोची सोशल मीडियावर चर्चा रंगली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :सोनम कपूरजान्हवी कपूरबॉलिवूड