Join us
Daily Top 2Weekly Top 5

जान्हवी कपूरने खरेदी केली नवी कार, किंमत वाचून थक्क व्हाल; मुंबईच्या रस्त्यावर दिसली झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 17:03 IST

जान्हवीने एक ब्रँड न्यू  कार खरेदी केली असून नुकतीच ती मुंबईच्या रस्त्यावर दिसली. 

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सध्या  साऊथमध्येही चर्चेत आहे. ज्युनिअर एनटीआरसोबत ती 'देवारा पार्ट 2' मध्ये झळकणार आहे. यामधलं त्यांचं एक रोमँटिक गाणंही नुकतंच रिलीज झालं. जान्हवी सध्या तिला मिळत असलेल्या यशाचा आनंद घेत आहे. त्यातच २७ वर्षीय अभिनेत्रीने स्वत:लाच एक महागडं गिफ्ट दिलं आहे. जान्हवीने एक ब्रँड न्यू  कार खरेदी केली असून नुकतीच ती मुंबईच्या रस्त्यावर दिसली. 

जान्हवी कपूरने नुकतीच  'टोयोटा लेक्सस' ही आलिशान कार खरेदी केली. ही एसयूव्ही भारतीय बाजारातलं सर्वात महागडं मॉडेल आहे. अनेक लक्झरीयस फीचर्स कारमध्ये आहेत. शिवाय याचा लूकही स्टायलिश आणि जबरदस्त आहे. मीडिया रिपोर्टनुसार या कारची शोरुम किंमत सुमारे 2 कोटी 50 लाख इतकी आहे. तर याची ऑन रोड किंमत 2 कोटी 87 लाख रुपये आहे. जान्हवी आपल्या नवीन कारमधून फेरफटका मारताना दिसली.

या कारमध्ये हाय एंड सुविधा आहेत. रिक्लायनर सीट, लेगरुमसाठी पुढे मागे स्लाईड करता येते. मल्टी पोजिशन टिपअप ज्यात सामान आरामात राहतं.  रणबीर कपूर आणि आयुषमान खुरानानेही काही दिवसांपूर्वीच हीच टोयोटा लेक्सस खरेदी केली होती. तर श्रद्धा कपूरने लँबॉर्गनी ही सर्वात महागडी कार खरेदी केली. 

टॅग्स :जान्हवी कपूरकारमुंबईसोशल मीडियाटोयोटालेक्सस