Join us
Daily Top 2Weekly Top 5

करिअरच्या सुरुवातीलाच जान्हवी कपूरने घेतला ‘धसका’! म्हणे, त्यापेक्षा न बोल्लेलचं बरं!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 05:46 IST

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर लवकरच बॉलिवूड डेब्यू करतेय. तिचा पहिला-वहिला चित्रपट ‘धडक’ येत्या शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. 

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर लवकरच बॉलिवूड डेब्यू करतेय. तिचा पहिला-वहिला चित्रपट ‘धडक’ येत्या शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. सध्या जान्हवी या चित्रपटाचे धडाक्यात प्रमोशन करतेय. आता प्रमोशन म्हटलं की, मुलाखती, मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे देणे हे सगळे आलेच. जान्हवीही यातून जातेय. पण हे करताना, ती बरीच सावधगिरी बाळगताना दिसतेय. अगदी ताकही फुंकून प्यावे, अशी वागतेय. आता याचे कारण काय तर, जान्हवीच्या मनात घर करून बसलेली भीती. होय, उत्साहाच्या भरात तोंडून निघालेल्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढला जाण्याची भीती तिला सतावतेय आणि त्यामुळेच फार काही बोलण्यापेक्षा न बोल्लेलचं बरं, असे जान्हवीने ठरवले आहे.

अलीकडे अनुपमा चोप्रा यांना दिलेल्या मुलाखतीत जान्हवीने स्वत:चं याचा खुलासा केला. तुमच्या तोंडून बाहेर पडलेल्या गोष्टीचा कसा अर्थ काढला जाईल, हे तुमच्या हातात नाही. मी अनेकदा उत्साहाच्या भरात बोलून गेले आणि मीडियाने त्याचा चुकीचा अर्थ लावला. तू कुण्या अभिनेत्रींच्या बायोपिकमध्ये काम करायला तुला आवडेल,असा प्रश्न अलीकडे मला केला गेला. मी यावर मधुबाला, मीना कुमारी अशा अभिनेत्रींची नावे घेतली. पण लगेच पापांचा मॅसेज आला. तू मधुबाला व मीना कुमारींची नावे का घेतली, असा त्यांचा प्रश्न होता. त्यामुळे बोलतांना मी अतिशय दक्षता बाळगते. किंबहुना गेल्या काही दिवसांत मी ही एकच गोष्ट शिकलीये, असे जान्हवी म्हणाली.खरे सांगायचे तर करिअरच्या अगदी सुरूवातीलाच जान्हवीने खूप मोठी गोष्ट शिकलीय. आता फक्त येत्या काळात ती यावर किती ठाम राहते, तेच तेवढे बघायचेय.

टॅग्स :जान्हवी कपूरधडक चित्रपटबॉलिवूड