Join us
Daily Top 2Weekly Top 5

"हो, मी प्लास्टिक सर्जरी केली...", जान्हवी कपूरने जाहीररित्या स्वीकारलं; म्हणाली, "आईनेच मला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 10:36 IST

काजोल आणि ट्विंकल खन्नाच्या शोमध्ये जान्हवी कपूरचा खुलासा

अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या लूक्समुळे चाहत्यांना कायम प्रेमात पाडते. साडी असो किंवा वेस्टर्न प्रत्येक लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसते. मात्र जान्हवी काही वर्षांपूर्वी खूप वेगळी दिसायची. आई श्रीदेवीसोबत जेव्हा ती पापाराझींसमोर आली होती तेव्हा तिचा चेहरा खूप वेगळा होता. तिला नीट हिंदीही बोलता येत नव्हतं. करण जोहरच्या 'धडक' सिनेमातून तिने पदार्पण केलं तेव्हा तिचा संपूर्ण कायापालट झाला होता. जान्हवीने प्लास्टिक सर्जरी केली अशी चर्चा झाली. आता तिने प्लास्टिक सर्जरीवर नुकतंच एका शोमध्ये प्रतिक्रिया दिली आहे.

काजोल आणि ट्विंकल खन्ना यांचा 'टू मच' हा शो खूप गाजतोय. अनेक सेलिब्रिटी या शोमध्ये येऊन धमाल करत आहेत. नुकतंच जान्हवी कपूर आणि करण जोहर या शोमध्ये पोहोचले. फीजिकल चीटिंग, इमोशनल चीटिंग सारखअया मुद्द्यांवरही ते बोलले.  यावेळी जान्हवीने आपण प्लास्टिक सर्जरी केल्याचं स्वीकारलं. ती म्हणाली, "मी आजपर्यंत जे काही केलं आहे ते अगदी विचारपूर्वक आणि माझ्या आईनेच दिलेल्या सल्ल्यावरुन केलं. आई माझ्यासोबत नेहमीच उभी होती. जर एखादी मुलगी असे व्हिडिओ किंवा कमेंट्स बघत असेल तेव्हा तिलाही तिचे लूक्स बदलण्याची गरज आहे असं वाटतं. बफेलो प्लास्टिक सर्जरी करावी वाटते. हा,पण यात जर काही चुकलं तर त्याहून वाईट काही नसतं. त्यामुळेच पारदर्शकता खूप गरजेची आहे."

ती पुढे म्हणाली, "माझा गेटकीपिंगवर विश्वास नाही. सोशल मीडियामुळे सुरुवातीला मी सुद्धा खूप प्रभावित व्हायचे.  प्रत्येक जण कसा दुसऱ्याबद्दल मत बनवतो आणि दिसण्यावरुन कमेंट्स करतो. परफेक्ट असणं गरजेचंच आहे असं तरुण मुलींना वाटतं जे चुकीचं आहे. तुम्हाला ज्यात आनंद मिळतो ते तुम्ही केलं पाहिजे."

जान्हवी कपूरने २०१८ साली 'धडक' सिनेमातून पदार्पण केलं. यानंतर ती 'गुंजन सक्सेना', 'रुही', 'उलझ', 'मिली', 'देवारा','परम सुंदरी' आणि आता नुकतंच 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'मध्ये दिसली.

English
हिंदी सारांश
Web Title : Janhvi Kapoor Admits to Plastic Surgery, Credits Mother's Advice

Web Summary : Janhvi Kapoor confessed to having plastic surgery, guided by her mother's advice. She emphasized the importance of transparency and doing what brings joy, cautioning against societal pressures for perfection and the need for plastic surgery.
टॅग्स :जान्हवी कपूरबॉलिवूडश्रीदेवी