Join us
Daily Top 2Weekly Top 5

Janhavi Kapoor : जान्हवी कपूरची ही कुठली फॅशन? नेटकरी भडकले; केली उर्फी जावेदशी तुलना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 16:38 IST

मुंबईत आयोजित एका ब्रँडच्या इव्हेंटमध्ये जान्हवीचा बोल्ड अवतार बघायला मिळाला.

अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) सध्या तिच्या ग्लॅमरस अवतारामुळे चर्चेत असते. मात्र कधीकधी तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलही केलं जातं. असाच जान्हवीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये ती अतिशय ट्रोल होत आहे. हिरव्या रंगाच्या बॅकलेस गाऊनमध्ये जान्हवी एका इव्हेंटला पोहोचली. तेव्हा तिच्या फॅशन सेन्सची तुलना उर्फी जावेदसोबत करण्यात आली.

मुंबईत आयोजित एका ब्रँडच्या इव्हेंटमध्ये जान्हवीचा बोल्ड अवतार बघायला मिळाला. मात्र तिचा लुक नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला नाही. हिरव्या रंगाचा गाऊन तिने परिधान केला होता. मात्र गाऊनची स्टाईल अतिशय विचित्र होती. त्यामुळे नेटकऱ्यांच्या काही ते पचनी पडले नाही.

 

जान्हवीचा हा लुक बघून नेटकरी म्हणाले,'तू कितीही प्रयत्न कर नोरा फतेही नाही बनू शकत','उर्फी जावेदकडूनच प्रेरणा घेतलेली दिसते','अशाच बॉलिवूड कलाकारांमुळे भारत मागे आहे' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या असून जान्हवीची खिल्ली उडवली आहे. हे काही पहिल्यांदा घडलेले नाही जान्हवी याआधीही अनेकदा तिच्या फॅशनमुळे ट्रोल झाली आहे.

टॅग्स :जान्हवी कपूरबॉलिवूडउर्फी जावेदफॅशनट्रोल