Join us
Daily Top 2Weekly Top 5

जॅकलिन फर्नांडिस लीलावती रुग्णालयात पोहचली, कठीण काळाचा सामना करतेय सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 09:36 IST

जॅकलिन फर्नांडिस सध्या कठीण काळाचा सामना करतेय.

श्रीलंकन ब्युटी अर्थात जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) हिने कलाविश्वात तिचा चांगलाच जम बसवला आहे. त्यामुळे बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. जॅकलीनने तिच्या सौंदर्य आणि अभिनयकौशल्याच्या जोरावर इंडस्ट्रीत तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. सध्या जॅकलिन फर्नांडिस कठीण काळाचा सामना करतेय. जॅकलिन फर्नांडिस तिच्या आईच्या आजारामुळे चर्चेत आहे. अशा परिस्थितीत, काल अभिनेत्री तिच्या आईला भेटण्यासाठी लीलावती रुग्णालयात पोहोचली. 

 जॅकलिनची आई किम यांना काही दिवसांपूर्वी मुंबईतील हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बुधवारी आईला भेटण्यासाठी अभिनेत्री रुग्णालयात पोहचतात, तिला पापराझींनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. जॅकलिनने पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. तिनं काळ्या मास्कने चेहरा झाकला होता. सोशल मीडियावर अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

माहितीनुसार, जॅकलिनची आई अजूनही आयसीयूमध्ये असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. रविवारी जॅकलिनचा 'किक' चित्रपटातील सह-कलाकार सलमान खान देखील रुग्णालयात दिसला होता. त्यानं जॅकलिनच्या आईची भेट घेतली होती. जॅकलिनच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, ती 'वेलकम टू द जंगल' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, दिशा पटानी, अर्शद वारसी, सुनील शेट्टी, रवीना टंडन, परेश रावल, लारा दत्ता, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, जॉनी लिव्हर, राजपाल यादव, किकू शारदा, दलेर मेहंदी आणि मिका सिंग यांच्यासह इतर कलाकारांचा समावेश आहे. 

टॅग्स :जॅकलिन फर्नांडिसबॉलिवूडसलमान खान