Join us
Daily Top 2Weekly Top 5

जॅकलीन फर्नांडिसने शेअर केला टॉपलेस फोटो, तिचा खास अंदाज बघून फॅन्सची उडाली झोप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2020 10:44 IST

जॅकलिनच्या या खास फोटोवर फॅन्सच्या भरभरून कमेंट्स येत आहेत. फॅन्सने तिला ब्युटीफुल, हॉट, सुंदर, माइंड ब्लोविंगसहीत अनेक कमेंट्स दिल्या आहेत.

जॅकलीन फर्नांडिस आपल्या बोल्ड फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा तिचा सेमी-न्यूड फोटो चर्चेत आलाय. ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट बॅकग्राउंडमध्ये शेअर केलेला हा फोटो पाहून फॅन्स तिचं भरभरून कौतुक करत आहेत. या मोनोक्रोम फोटोमध्ये जॅकलीन फारच ग्लॅमरस दिसत आहे. या फोटोला तिने - 'Far far away...' असं कॅप्शन दिलंय.

जॅकलीनच्या या खास फोटोवर फॅन्सच्या भरभरून कमेंट्स येत आहेत. फॅन्सने तिला ब्युटीफुल, हॉट, सुंदर, माइंड ब्लोविंगसहीत अनेक कमेंट्स दिल्या आहेत. हे पहिल्यांदा नाहीये की, जॅकलिनने सेमी-न्यूड लूकमध्ये फोटोशूट केलं. याआधीही तिने असे फोटो शेअर केले आहेत. इन्स्टाग्रामवर ४६ मिलियन फॉलोअर्स झाल्यावर तिने असाच फोटो शेअर केला होता.

जॅकलीन तिचे बोल्ड फोटोज नेहमीच शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिने व्हाइट टॉप आणि रस्ट कलरच्या बॉटम विअरमध्ये काही फोटो शेअर केले होते. यात ती फारच वेगळ्या अंदाजात दिसत होती. जॅकलिन आता 'भूत पोलिस' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाच्या शूटींगमध्ये ती बिझी आहे. यातील तिचा फोटोही समोर आला आहे. सध्या या सिनेमाचं शूटींग धर्माशाला येथे सुरू आहे.

'भूत पोलिस' मध्ये जॅकलीनसोबत सैफ अली खान, अर्जुन कपूर आणि यामी गौतम दिसणार आहे. हे सर्वच कलाकार धर्मशालामध्ये शूटींगमध्ये व्यस्त आहेत. 

टॅग्स :जॅकलिन फर्नांडिसबॉलिवूडसोशल मीडियासोशल व्हायरल