Join us
Daily Top 2Weekly Top 5

Jacqueline Fernandez: जुन्या व्हिडिओमुळे जॅकलीन फर्नांडिस ट्रोल, म्हणाली कॉस्मेटिक सर्जरी वाईट..

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 11:20 IST

जॅकलीनचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होतोय  ज्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे. यामध्ये तिने कॉस्मेटिक सर्जरी चुकीचे असल्याचे म्हणले आहे.

श्रीलंकन ब्युटी जॅकलीन फर्नांडिसच्या सौंदर्यावर अनेक जण फिदा आहेत. पण आता जॅकलीनचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होतोय  ज्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे. यामध्ये तिने कॉस्मेटिक सर्जरी चुकीचे असल्याचे म्हणले आहे.  (Social Media)

जैकलीन फर्नांडिसचा हा व्हिडिओ २००६ च्या 'मिस युनिव्हर्स' पेजेंटचा आहे. यामध्ये जॅकलीनला कॉस्मेटिक सर्जरीवरुन प्रश्न विचारण्यात येत.  त्यावर ती सांगते, (Cosmetic Surgery) कॉस्मेटिक सर्जरी हे एक अनफेयर अॅडव्हांटेज आहे. महिलांच्या नैसर्गिक सौंदर्याचा सन्मान केला पाहिजे. कॉस्मेटिक सर्जरी कोणाला परवडेल कोणाला नाही हे देखील एक मुद्दा आहे.या गोष्टींना प्रोत्साहन देणे हा ब्युटी पेजेंटचा अर्थ होत नाही.

या व्हिडिओत जॅकलीन फार वेगळी दिसत आहे. आणि तेच आज तिचा लुक खुपच वेगळा आहे. असं बोलून स्वत: प्लास्टिक सर्जरी केलीच म्हणून तिला (Troll) ट्रोल केले जात आहे. 'बघा कोण बोलतंय' असं म्हणून जॅकलीनची खिल्ली उडवली गेली. 'ही आता किती वेगळी दिसत आहे, हिला ओळखताच येत नाहीए' असे म्हणत सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.

सध्या जॅकलीन वेगळ्याच कारणाने चर्चेत होती. मनी लॉंड्रिंग प्रकरणी तिची ईडी कडून चौकशी सुरु होती. बॉयफ्रेंड सुकेश सध्या तुरुंगात असून त्याच्याकडून महागडे गिफ्ट घेतल्याप्रकरणी तिचा चौकशी सुरु होती. तर जॅकलीन आता रोहित शेट्टीच्या सर्कस सिनेमात दिसणार आहे. 

टॅग्स :जॅकलिन फर्नांडिसट्रोलसोशल मीडिया