Join us

'भारत'मध्ये जॅकी श्रॉफ साकारणार ही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 06:00 IST

सलमान खानच्या आगामी सिनेमा 'भारत'ला घेऊन रोज नवी माहिती मिळत असते. यात सलमान खानच्या वडिलांची भूमिका जॅकी श्रॉफ साकारणार आहे.

ठळक मुद्दे‘भारत’ चित्रपटाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल तब्बल आठ वर्षानंतर सलमान आणि जॅकी स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.

सलमान खानच्या आगामी सिनेमा 'भारत'ला घेऊन रोज नवी माहिती मिळत असते. यात सलमान खानच्या वडिलांची भूमिका जॅकी श्रॉफ साकारणार आहे. यात सलमान खानच्या पत्नीची भूमिका प्रियांका चोप्रा साकारणार आहे. तब्बल आठ वर्षानंतर सलमान आणि जॅकी स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. 2010मध्ये आलेल्या 'वीर'मध्ये दोघे शेवटचे एकत्र दिसले होते. मीडिया रिपोर्टनुसार जॅकी श्रॉफची भूमिका फार मोठी नसणार आहे मात्र महत्त्वाची असेल जो सलमानच्या भूमिकेला आकार देईल.   सलमान आणि प्रियांकाचा यात पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. सलमानचं नाही तर प्रियांका चोप्रा ही सुद्धा यात पाच वेगवेगळ्या रूपात आहे.वाढत्या वयासोबत प्रोस्थेटिक्सच्या मदतीने तिचे लूक्स तयार केले जातील.

हा सिनेमा कोरियन ब्लॉकबस्टर ‘ओड टू माई फादर’चा आॅफिशिअल हिंदी रिमेक आहे.‘भारत’ चित्रपटाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. भारत नावाच्या एका सामान्य व्यक्तिची कथा यात दिसेल. मी परतलो नाही तर तू कुटुंबाचा सांभाळ करशील, असे भारतचे वडिल फाळणीच्या काळात स्थलांतर करताना भारतला सांगतात. या कथेत भारतचा ५० वर्षांचा प्रवास दाखवला जाणार असल्याने प्रत्येक दहा वर्षांच्या अंतराने सलमानचे लूक बदलताना दिसेल. यातले एक लूक मॉडर्न असेल. याकाळात प्रियांका व त्याचे प्रेम होईल आणि नंतर लग्न. चित्रपटाच्या कथेनुसार, सलमानला आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी सर्कशीत काम करावे लागते. यात तो ‘मौत का कुआँ’मध्ये मोटरसायकलवर चित्तथरारक कसरती करताना दिसेल. त्याच्यासोबत या काळात दिशा पटानीही दिसणार असल्याचे समजते आहे. हा चित्रपट २०१९ मध्ये ईदला प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :जॅकी श्रॉफ