Join us
Daily Top 2Weekly Top 5

क्या भीडू! जॅकी श्रॉफचं खरं नाव माहीत आहे का? नावामागची गोष्ट वाचून तुम्हाला बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 16:38 IST

जग्गू दादाच्या आयुष्यातील काही माहिती नसलेल्या गोष्टी सांगणार आहोत.

बॉलिवूडचा अभिनेता जॅकी श्रॉफचा आज बर्थ डे आहे. जॅकी श्रॉफ यांचा जन्म 1 फेब्रुवारी 1957ने साली महाराष्ट्रातील लातूर येथील उदगीर येथे त्याचा जन्म झाला. झालाय 200 पेक्षा जास्त सिनेमात काम केलेल्या जग्गू दादाने बालपण हालाखीत गेले आहे. त्याच्या बर्थ डेच्या निमित्ताने जग्गू दादाच्या आयुष्यातील काही माहिती नसलेल्या गोष्टी सांगणार आहोत.  जॅकीचे पूर्ण नाव जयकिशन काकुभाई श्रॉफ असे आहे. जॅकीचे वडील काकुभाई हरिभाऊ श्रॉफ गुजराती होते. तर आई तुर्की. 

जॅकी आईवडिलांसोबत मुंबईमध्ये मलबार हिल एरिया मध्ये तीन बत्ती भागात राहत होता. तुम्हा ऐकून आश्चर्य वाटेल पण अभिनेता आणि मॉडेल बनण्याआधी जॅकी त्या भागातला गुंड म्हणून ओळखला जायचा. जग्गू दादा म्हणून लोक त्याला ओळखायचे. जॅकीने यामागची कहानी एकदा सांगितली होती. माझा भाऊ आमच्या वस्तीतचा खरा दादा होता. तो सर्वांची मदत करायचा. एकेदिवशी कुणाला तरी वाचवण्यासाठी पोहता येत नसूनही तो समुद्रात उतरला आणि माज्या डोळ्यांसमोर बुडाला. भावाच्या मृत्यूनंतर वस्तीच्या भल्यासाठी काम करायचे असे मी ठरवले आणि भावाची जागा घेतली. इथून जग्गू दादाचा जन्म झाला, असे त्याने सांगितले होते.

एकदिवस बस टॉपवर बसची प्रतीक्षा करीत असताना एका माणसाने जॅकीला मॉडेलिंग करणार का? असा प्रश्न केला. त्यावर किती पैसे देणार, हा जॅकीचा पहिला प्रश्न होता. यानंतर जॅकी मॉडेलिंग करू लागला. एक दिवस जॅकी देवआनंद यांच्या ‘स्वामी दादा’ या चित्रपटाचे शूटींग बघायला गेला. गर्दीत जॅकी उभा होता. पण गदीर्पेक्षा वेगळा दिसत होता. देवआनंद यांची नजर त्याच्यावर गेली आणि त्यांनी जॅकीला जवळ बोलवले. एवढेच नाही तर त्याला एक लहानसा रोल ऑफर केला. अशाप्रकारे जॅकी मोठ्या पडद्यावर अवतरला.

यानंतर नशीबाने जॅकीला अशीच एक मोठी संधी दिली. बड्या स्टार्सचे नखरे पाहून दिग्दर्शक सुभाष घई यांनी नवा चेहरा घेऊन चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या या निर्णयाने जॅकीला ‘हिरो’ मिळाला. १९८३ मध्ये आलेल्या या चित्रपटाने जॅकीला ख-या अथार्ने हिरो बनवले. सुभाष घई यांनीच जय किशन याला जॅकी हे नाव दिले .

टॅग्स :जॅकी श्रॉफ