सध्या अभिषेक बच्चनच्या आगामी I want to talk सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. हा सिनेमा २२ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. अभिषेक बच्चनची आजवरची वेगळी भूमिका I want to talk सिनेमा दिसतेय. अभिषेक बच्चनसोबत जॉनी लिव्हर यांचीही सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. हा सिनेमा 'पिकू', 'विकी डोनर', 'सरदार उधम', 'ऑक्टोबर' यांसारखे सिनेमे दिग्दर्शित करणाऱ्या शूजित सरकार यांनी बनवला आहे. अभिषेकचा I want to talk सिनेमा सुप्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी पाहिला. इम्तियाज यांना हा सिनेमा कसा वाटला? याविषयी त्यांनी खुलासा केलाय.
इम्तियाज अलींना कसा वाटला I want to talk?
इम्तियाज अलींनी अभिषेक बच्चनचा I want to talk सिनेमा पाहून त्यांची प्रतिक्रिया सांगितली आहे. "सेंटी केलं यार! शूजित सरकारचा हा सिनेमा मी सर्वांना बघायला सांगेल. अभिषेक बच्चनचा आजवरचा बेस्ट परफॉर्मन्स. शाबासकीची थाप अन् रितेश शाहला खूप शुभेच्छा." अशी पोस्ट लिहून इम्तियाज अलींनी सिनेमा पाहिल्यावर त्यांचं मत मांडलंय. अशाप्रकारे 'जब वी मेट', 'चमकिला'चे दिग्दर्शक इम्तियाज अलींना I Want To Talk सिनेमा चांगलाच आवडलेला दिसतोय यात शंका नाही.
I Want To Talk सिनेमाविषयी
अभिषेक बच्चनची प्रमुख भूमिका असलेला I Want To Talk सिनेमा २२ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. शूजित सरकार यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. याशिवाय या सिनेमात जॉनी लिव्हर आणि अहिल्या बमरु या कलाकारांचीही प्रमुख भूमिका आहे. स्वतःचा आजारपण सांभाळत कुटुंबाला आणि आयुष्याला सांभाळणाऱ्या माणसाची भूमिका अभिषेक करताना दिसणार आहे. अभिषेकचा लूक, त्याचा अभिनय, भूमिकेसाठी त्याने वाढवलेलं वजन सर्वांचं लक्ष वेधून घेतोय