Join us
Daily Top 2Weekly Top 5

'जब वी मेट २'बाबत दिग्दर्शकाचा मोठा खुलासा, म्हणाले, "चित्रपटाच्या सीक्वलसाठी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 10:48 IST

'जब वी मेट २'च्या चर्चांना उधाण आलं होतं. आता इम्तियाज अली यांनी 'जब वी मेट २' बाबत मोठा खुलासा केला आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि करीना कपूर मुख्य भूमिकेत असलेला 'जब वी मेट' सुपरहिट ठरला होता. २००७ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने चाहत्यांना वेड लावलं होतं. या चित्रपटातील करीना आणि शाहिदची जोडी प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस उतरली होती. १८ वर्षांनंतर 'जब वी मेट'च्या सीक्वलच्या चर्चा रंगल्या होत्या. शाहिदने सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर साधलेल्या संवादात जब वी मेटचे दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्याबरोबर पुन्हा काम करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर 'जब वी मेट २'च्या चर्चांना उधाण आलं होतं. 

आता इम्तियाज अली यांनी 'जब वी मेट २' बाबत मोठा खुलासा केला आहे. 'न्यूज १८' ला दिलेल्या मुलाखतीत इम्तियाज अली म्हणाले, "माझ्याकडे सध्या तरी जब वी मेटच्या सीक्वलसाठी चांगली कथा नाही. त्यामुळे 'जब वी मेट २' चित्रपट बनत नाहीये. मी याबाबत अनेक ठिकणी वाचलं. मी याबाबत कोणीही मला विचारलं नाही. तरीही बघूया पुढे काय होतंय."

इम्तियाज अली त्यांचा आगामी चित्रपट चमकीलामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ते सध्या व्यग्र आहेत. या चित्रपटात दिलजीत दोजांझ आणि परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत आहेत. इम्तियाज अली यांनी 'लव्ह आज कल', 'रॉकस्टार', 'तमाशा', 'जब हॅरी मेट सेजल', 'हायवे' यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे. 

टॅग्स :इम्तियाज अलीशाहिद कपूरकरिना कपूर