Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या पाली हिलमध्ये ईशान खट्टरने खरेदी केला फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 13:04 IST

ऑस्करला गेला सिनेमा, ईशान खट्टरची मोठी खरेदी

'होमबाउंड' हा सिनेमा भारताकडून यंदा ऑस्करला पाठवण्यात आला. करण जोहर निर्मित या सिनेमाचं खूप कौतुक झालं होतं.  सिनेमात ईशान खट्टर आणि विशाल जेठवा मुख्य भूमिकेत होते. ईशान खट्टरने त्याच्या करिअरमध्ये कायम विविधांगी भूमिका केल्या आहेत. आता त्याने वैयक्तिक आयुष्यातही मोठा टप्पा गाठला आहे. मुंबईतील सर्वात उच्चभ्रू आणि सेलिब्रिटींचा आवडता परिसर समजल्या जाणाऱ्या वांद्रे येथील 'पाली हिल' भागात ईशानने स्वतःचे हक्काचे घर खरेदी केले आहे. अनेक दिग्गज कलाकारांचे वास्तव्य असलेल्या या भागात आता ईशानचाही समावेश झाला असून, त्याने या घरासाठी मोठी रक्कम मोजली आहे.

'सीआरई मॅट्रिक्स' या रिअल इस्टेट डेटा फर्मने दिलेल्या माहितीनुसार, ईशानने पाली हिलमधील 'नवरोज अपार्टमेंट'मध्ये हे घर घेतले आहे. या लक्झरी फ्लॅटची किंमत तब्बल २९.३७ कोटी रुपये इतकी आहे. जवळपास २,९८९ स्क्वेअर फूट परिसरात पसरलेल्या या घरासाठी ईशानने प्रति स्क्वेअर फूट सुमारे ९८,२०० रुपये मोजले आहेत. यावरून या भागातील घरांच्या वाढत्या किमतींचा अंदाज येतो.

या घराच्या व्यवहारासाठी ईशानने केवळ मुद्रांक शुल्क (Stamp Duty) आणि नोंदणी शुल्कापोटी (Registration Charges) १.७६ कोटी रुपये खर्च केले आहेत. कपिल एम. महतानी यांच्याकडून त्याने हा फ्लॅट खरेदी केला असून नुकतीच या व्यवहाराची प्रक्रिया पूर्ण झाली. इतक्या कमी वयात मुंबईच्या सर्वात पॉश भागात घर घेतल्याने ईशानवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.

ईशान खट्टरने ओटीटीवरही एकापेक्षा एक सीरिज दिल्या आहेत. गेल्या वर्षी आलेल्या 'द रॉयल्स' सीरिजचं कौतुक झालं होतं. त्याआधी 'द सूटेबल बॉय','द परफेक्ट कपल'मध्येही तो दिसला होता. तर होमबाउंड सिनेमाच्या त्याच्या करिअरमध्ये महत्वाची भूमिका बजावली. या सिनेमाचं कान्स फेस्टिवलमध्येही स्क्रीनिंग झालं होतं. तिथे त्यांना ९ मिनिटांचं स्टँडिंग ओवेशन मिळालं.

English
हिंदी सारांश
Web Title : Ishan Khattar Buys Luxury Apartment in Mumbai's Posh Pali Hill

Web Summary : Ishan Khattar purchased a ₹29.37 crore apartment in Pali Hill, Mumbai. The 2,989 sq ft flat in Navroj Apartment cost ₹98,200 per sq ft. He paid ₹1.76 crore for stamp duty and registration. The actor has delivered stellar performances in series like 'The Royals'.
टॅग्स :इशान खट्टरबॉलिवूडमुंबईसुंदर गृहनियोजन