Join us
Daily Top 2Weekly Top 5

तब्बूसोबतच्या बोल्ड सीनबाबत इशानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, तब्बू मात्र अजूनही गप्पच....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 12:02 IST

मीरा नायर यांना सलाम बॉम्बे, मॉन्सून वेडिंग आणि द नेमसेकसारख्या आंतरराष्ट्रीय सिनेमांसाठी ओळखलं जातं. आता या नव्या सीरीजमध्ये इशान खट्टर एका नेत्याच्या मुलाची भूमिका साकारत आहे.

विक्रम सेठची कादंबरी 'A Suitable Boy' आधारित मीरा नायर यांच्या टीव्ही सीरीजमध्ये मान कपूरची भूमिका निभावणारा अभिनेता इशान खट्टर सध्या चांगलाच चर्चेत आहे. यात तो सईदा बाई म्हणजेच अभिनेत्री तब्बूसोबत बोल्ड सीन करताना दिसत आहे. याबाबत त्याने पहिल्यांदाच मोकळेपणाने सांगितलं.

खट्टर, मीरा नायर यांनी दिग्दर्शित केलेल्या बीबीसीच्या ६ भागांच्या सीरीजमधून टेलिव्हिजनवर पदार्पण करत आहे. मीरा नायर यांना सलाम बॉम्बे, मॉन्सून वेडिंग आणि द नेमसेकसारख्या आंतरराष्ट्रीय सिनेमांसाठी ओळखलं जातं. आता या नव्या सीरीजमध्ये इशान खट्टर एका नेत्याच्या मुलाची भूमिका साकारत आहे.

इशानने सांगितले की, 'हे आजच्या काळातील एक असहज नातं आहे. कथेत एक बोल्ड सीन आहे. ती एक मुस्लिम वेश्या आहे आणि एक हिंदू परिवारातील एका मंत्र्याचा मुलगा आहे. तो जवळपास तिच्यापेक्षा अर्ध्या वयाने लहान आहे. पण हे एक फार सुंदर नातं आहे'.

'धडक' सिनेमातून रूपेरी पडद्यावर पदार्पणे केलेल्या इशानने सांगितले की, मान कपूरची भूमिका त्याच्या करिअरसाठी महत्वाची आहे. तो म्हणाला की, शूटींग सुरू होण्याआधी त्याने भूमिका व्यवस्थित समजून घेण्यासाठी कादंबरी वाचली होती.

दरम्यान, मीरा नायर यांनी तब्बूच्या भूमिकेबाबत सांगितले की, तब्बूऐवजी दुसरी अभिनेत्री असती तर ही भूमिका जिवंत झाली नसती. तब्बूमुळे या भूमिकेत जीव आलाय. रोल कसाही असो ती त्याला चीप लूक देत नाही. 

हे पण वाचा :

'या' अभिनेत्रीला सिनेमात बोल्ड सीन दिल्यामुळे घरच्यांनी धक्के मारत काढले होते घराबाहेर….

बहने देती है 100 % रिटर्न्स...! रक्षाबंधनाला अक्षय कुमारने दिले बिग सरप्राईज

टॅग्स :इशान खट्टरतब्बूमीरा नायर