Join us
Daily Top 2Weekly Top 5

ईशा कोप्पिकरचा धक्कादायक खुलासा, बॉलिवूड अभिनेत्यावर कास्टिंग काऊचचे आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 09:24 IST

ईशा कोप्पिकरला अश्रू अनावर, म्हणाली...

'खल्लास गर्ल' ईशा कोप्पिकर (Isha Koppikar) मोठ्या पडद्यावरुन गायब आहे. एकेकाळी अभिनेत्रीने सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. काही दिवसांपूर्वीच ईशाने पती टिम्मी नारंगपासून घटस्फोट घेतला. यामुळे ती चर्चेत आली होती. आता नुकतंच तिने एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे. वयाच्या 18 व्या वर्षीच ती कास्टिंग काऊचचा शिकार झाली होती. 

सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत ईशा कोप्पिकर म्हणाली, "मी १८ वर्षांची होते. एका प्रसिद्ध अभिनेत्याने आणि त्याच्या सेक्रेटरीने मला कास्टिंग काऊचसाठी संपर्क केला होता. कामासाठी तुला अभिनेत्यासोबत जवळीक साधावी लागेल असं मला सांगण्यात आलं होतं. अभिनेत्यांचे सेक्रेटरीही चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचे. हाताला जोरात धरुन ते म्हणायचे की अभिनेत्यासोबत मैत्री करावी लागेल."

ती पुढे म्हणाली, "मी २३ वर्षांची असताना एका अभिनेत्याने मला एकटंच बोलावलं होतं. त्या अभिनेत्याचे इतर अभिनेत्रींसोबत संबंध होते अशीही अफवा होती. तो मला म्हणाला की माझ्याबाबतीत आधीपासूनच चर्चा आहेत आणि अफवा पसरत आहेत. पण मी त्याला भेटायला नकार दिला. मी एकटी येणार नाही असं मी त्याला स्पष्ट सांगितलं. तो हिंदी फिल्म इंडस्ट्रीतला मोठा स्टार आहे."

हे सांगताना ईशा कोप्पिकरला अश्रू अनावर झाले होते. "मी इतकी साधी आहे की एकदा एकता कपूरने मला थोडा अॅटिट्यूड ठेव असा सल्ला दिला होता त्याकाळी अनेक अभिनेत्रींनी इंडस्ट्री सोडली. मुलींनी हार मानली. अशा खूप कमी आहेत ज्या इंडस्ट्रीत टिकून राहिल्या. मी त्यापैकीच एक आहे" असंही ती म्हणाली.

टॅग्स :इशा कोप्पीकरकास्टिंग काऊचबॉलिवूड