Join us
Daily Top 2Weekly Top 5

धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीला भेटली होती ईशा देओल, सनी देओलनेच केली होती मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 15:51 IST

हेमा मालिनी यांच्या परिवारातील प्रकाश कौर यांच्या घरी जाणारी ईशा पहिली सदस्य होती.

अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) मुलगा करण देओल (Karan Deol) नुकताच लग्नबंधनात अडकला. यावेळी संपूर्ण देओल कुटुंब पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद झालं. विशेषत: सनी देओलची आई आणि पत्नी सर्वांसमोर आल्या. तर दुसरीकडे अभिनेत्री हेमा मालिनी यांनी लग्नात हजेरी न लावल्याने चर्चेला उधाण आले. दरम्यान करणची आत्या ईशा देओलने (Isha Deol) सोशल मीडियावर पोस्ट करत न्यूली वेड कपलला शुभेच्छा दिल्या. पण तुम्हाला माहितीए का ईशा देओल आणि धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांची एकदा भेट झाली आहे. या भेटीसाठी स्वत: सनी देओलनेच पुढाकार घेतला होता.

धर्मेंद्र यांनी खूप कमी वयात प्रकाश कौर यांच्याशी लग्न केलं होतं. त्यांना चार मुलंही झाली होती. दरम्यान बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर ते हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले. पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता त्यांनी हेमा मालिनींशी दुसरं लग्न केलं. त्यांना ईशा आणि आहाना देओल या दोन मुली झाल्या. हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबाशी काहीच संबंध ठेवायचा नाही अशी अट ठेवली गेली होती. बऱ्याच वर्षांनी अशी वेळ आली की ईशा आणि प्रकाश कौर यांची भेट झालीच. 

'हेमा मालिनी बियॉन्ड द ड्रीम गर्ल' या आत्मचरित्रात ईशाने खुलासा केला की ती प्रकाश कौर यांच्या घरी जाणारी हेमा मालिनी यांच्या परिवारातील पहिली सदस्य होती. धर्मेंद्र यांचे भाऊ अजित देओलसोबत ईशा आणि आहानाचं जवळचं नातं होतं. 2015 मध्ये जेव्हा अजित देओल यांची तब्येत बिघडली होती तेव्हा त्यांना धर्मेंद्र यांच्या घरीच ठेवण्यात आले होते. ईशाला त्यांना भेटण्याची इच्छा होती त्यामुळे तिला धर्मेंद्र यांच्या घरीत जाणे भाग होते.

ईशाने नंतर सनी देओलला फोन केला आणि काकांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी सनीनेच ईशा आणि अजित देओल यांच्या भेटीसाठी मदत केली होती. त्यावेळी ईशा आणि प्रकाश कौर यांचीही पहिल्यांदाच भेट झाली. ईशाने प्रकाश कौर यांचे पाया पडून आशिर्वाद घेतले. तेव्हा प्रकाश कौर यांनी तिला आशिर्वाद दिला आणि त्या तिथून निघून गेल्या.

टॅग्स :इशा देओलधमेंद्रसनी देओलहेमा मालिनी