Join us

विजय वर्मा तमन्ना भाटियाला करतोय डेट? खुद्द अभिनेत्यानेच अशी रिअ‍ॅक्शन देत दिला दुजोरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 19:57 IST

Vijay Varma : 'दहाड' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी सोनाक्षी सिन्हानं जेव्हा विजयला तमन्नावरुन छेडले तेव्हा त्याने दिलेली प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे.

सोनाक्षी सिन्हा, विजय वर्मा, सोहम शाह आणि गुलशन देवा यांची मुख्य भूमिका असलेला 'दहाड' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप मोठा प्रतिसाद मिळतो आहे. दरम्यान दहाडचे प्रमोशनही मोठ्या प्रमाणात सुरु झाले आहे. काही दिवसांपासून अभिनेता विजय वर्मा आणि टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया यांच्या अफेयरची, डेटिंगची चर्चा रंगली आहे. या दोन्ही सेलिब्रेटींना यावरुन प्रश्न विचारले असता त्यांनी या गोष्टीचा स्वीकार केलेला नाही. त्यावर बोलणेही टाळले आहे. अशावेळी सोनाक्षी सिन्हानं जेव्हा विजयला तमन्नावरुन छेडले तेव्हा त्याने दिलेली प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे.

सोनाक्षी सिन्हाने तमन्नावरुन छेडल्यावर विजयची प्रतिक्रिया खूप काही सांगून गेली. विजयनं भलेही शब्दांतून त्याच्या भावना व्यक्त केल्या नसतील पण त्याच्या चेहऱ्यावरील ते हास्य खूप काही सांगून गेले. अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. त्यातून असे दिसून येते की, विजय आणि तमन्ना हे एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या प्रतिक्रिया तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर समोर आल्या आहेत. बऱ्याच दिवसांपासून विजय वर्मा आणि तमन्नाच्या डेटिंगची चर्चा रंगली आहे.

सोनाक्षीने विजयला तमन्नाच्या प्रश्नावरुन बोलते केले तेव्हा विजयचा चेहरा भलताच खुलला होता. त्याच्या चेहऱ्यावरील हास्य खूप काही सांगून जाणारे होते. त्याने तमन्नाचे नाव काही घेतले नाही. पण हसणे काही थांबण्याचे नाव घेत नव्हते. त्यावरुन आता नेटकऱ्यांनी अंदाज बांधला की, ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत. विजय आणि तमन्नाच्या डेटिंगची चर्चा यापूर्वी देखील रंगली होती. नव्या वर्षात गोव्याला या दोन्ही सेलिब्रेटींचे व्हॅकेशन हे साऱ्या चाहत्यांना वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास भाग पाडत होते. तो व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तसेच काही दिवसांपूर्वी दोघांना डिनर डेटला गेल्याचेही स्पॉट करण्यात आले होते.

टॅग्स :तमन्ना भाटिया