Join us
Daily Top 2Weekly Top 5

दुबईत अडकलेल्या लोकांसाठी धावून आला बॉलिवूड अभिनेता, म्हणाला- "मी तुमची फ्रीमध्ये राहण्याची व्यवस्था करेन..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 12:49 IST

युद्धाचा परिणाम हवाई वाहतुकीवर झाल्याने काही नागरिक दुबईतच अडकून पडले आहेत. त्या नागरिकांसाठी बॉलिवूडचा अभिनेता धावून आला आहे. 

अमेरिका-इस्रायल-इराण युद्धामुळे परदेशात काही भारतीय नागरिक अडकून पडले आहेत. इराणने प्रत्युत्तर म्हणून युएईमधील काही देशांमध्ये असलेल्या अमेरिकेच्या तळांवर हल्ले केले आहेत. दुबईतही काही ठिकाणांवर हल्ले करण्यात आले आहेत. या युद्धाचा परिणाम हवाई वाहतुकीवर झाल्याने काही नागरिक दुबईतच अडकून पडले आहेत. त्या नागरिकांसाठी बॉलिवूडचा अभिनेता धावून आला आहे. 

अभिनेता सोनू सूद दुबईत अडकलेल्या लोकांना मदत करणार आहे. सोनू सूद दुबईत अडकून पडलेल्यांसाठी फ्रीमध्ये राहण्याची व्यवस्था करणार आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत त्याने याबाबत माहिती दिली आहे. "युद्धामुळे जर कोणी दुबईत अडकून पडलं असेल तर मी हे सांगू इच्छितो की आम्ही तुमच्या राहण्याची व्यवस्था कोणतेही पैसे न देता करत आहोत. केवळ भारतीयच नाही तर इतर कुठल्याही देशाचे लोक जे अडकले असतील. मला फक्त इन्स्टाग्रामवर मेसेज करा. तुम्ही तुमच्या देशात सुखरुप परत जाईपर्यंत राहण्याची व्यवस्था करण्यात येईल". 

सोनू सूद हा कायमच लोकांची मदत करत असतो. बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवच्या मदतीसाठीही तो धावून गेला होता. आता युद्ध सुरू असताना मोठ्या मनाने सोनू सूदने दुबईत अडकलेल्या लोकांना मदत करण्याची तयारी दाखवली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sonu Sood Offers Free Stay to Stranded People in Dubai

Web Summary : Bollywood actor Sonu Sood is offering free accommodation to people stranded in Dubai due to the ongoing conflicts. He invites anyone, regardless of nationality, to message him on Instagram for assistance until they can safely return home. He previously helped Rajpal Yadav.
टॅग्स :इराणइस्रायलसोनू सूद