Join us

Viral Pic : काश्मीरात सापडला अक्षय कुमारचा ‘डुप्लिकेट’, पाहून पडाल चाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 13:32 IST

आणखी काही वर्षांनंतर अक्षय कुमार हुबेहुब या फोटोतील व्यक्तिसारखा दिसेल.

ठळक मुद्देअक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. सध्या हा चित्रपट बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालतोय.

अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’ या सिनेमाची बॉक्स ऑफिसवरची घोडदौड सुरु असताना तूर्तास बॉलिवूडचा हा ‘खिलाडी’ एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. होय, तूर्तास अक्षय कुमारसारख्या हुबेहुब दिसणा-या एका व्यक्तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आणखी काही वर्षांनंतर अक्षय कुमार हुबेहुब या फोटोतील व्यक्तिसारखा दिसेल.अक्षय कुमारचा हा ‘डुप्लिकेट’ जम्मू काश्मीरच्या श्रीनगरचा राहणारा आहे. त्याचे नाव आहे, माजिद मीर. माजिद पाहायला अक्षय कुमारसारखा आहे. पण प्रत्यक्षात तो सुनील गावस्कर यांचा चाहता आहे. इतका की, तो रोज सुनील गावस्कर यांच्यासारखी हॅट घालून असतो. एका चॅनलच्या असोसिएट एडिटरने माजिदसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि हा फोटो लगेच व्हायरल झाला.

हा फोटो पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या कमेंट दिल्या. ‘हा तर म्हातारपणीचा अक्षय कुमार,’ असे एका युजरने लिहिले. अनेक लोक हा फोटो वारंवार झूम करून बघू लागले. काय हा अक्षय कुमार आहे? असा प्रश्न अनेकांनी केला.

अद्याप अक्षयने या फोटोवर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण त्याने हा फोटो बघितलाच तर तो सुद्धा अवाक् होईल, इतके नक्की.

अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. सध्या हा चित्रपट बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालतोय. यानंतर हाऊसफुल 4, गुड न्यूज, सूर्यवंशी, लक्ष्मी बॉम्ब, बच्चन पांडे, पृथ्वी राज चौहान असे अक्षयचे अनेक चित्रपट एकापाठोपाठ एक रिलीज होणार आहेत. जगभरातील सर्वाधिक कमाई करणा-या कलाकारांच्या यादीत अक्षय कुमारने चौथे स्थान पटकावले आहे. फोर्ब्स मासिकाने नुकतीच जगभरातील सर्वाधिक मानधन घेणा-या कलाकारांची यादी जाहीर केली. या यादीत स्थान मिळवणारा अक्षय कुमार हा एकमेव बॉलिवूड स्टार आहे. अक्षयने ब्रॅडली कॉपर, विल स्मिथ, जॅकी चॅन अशा हॉलिवूड स्टार्सला मागे टाकत या यादीत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. 

टॅग्स :अक्षय कुमार