Join us

विनोद भानुशाली यांच्या मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाचा छापा; अडचणी वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 08:07 IST

विनोद भानुशाली यांची कंपनी याआधी देशातील आघाडीच्या संगीत आणि निर्मिती कंपन्यांशी जोडली होती.

मुंबई: कर चुकवल्याचा आरोपाखाली आज सकाळपासून निर्माते विनोद भानुशाली आणि बॉलीवूडच्या इतर काही प्रॉडक्शन हाऊसच्या कार्यालयावर आयकर विभागाने आज सकाळी छापेमारी टाकली. त्यामुळे विनोद भानुशाली यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. चित्रपट निर्माते जयंतीलाल गडा यांच्या घरावरही  आयकर विभागाची छापेमारी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. विनोद भानुशाली यांची कंपनी याआधी देशातील आघाडीच्या संगीत आणि निर्मिती कंपन्यांशी जोडली होती.

काही काळापूर्वी विनोद भानुशाली यांनी आपलं स्वताचं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, कथित करचोरी आणि आर्थिक अनियमिततेसाठी हे छापे टाकण्यात येत आहेत. आयकर अधिकाऱ्याने विनोद यांच्या 'भानुशाली स्टुडिओ लिमिटेड', वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मधील हिट्स म्युझिक आणि भानुशालींच्या कार्यालयावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. 

टॅग्स :बॉलिवूडइन्कम टॅक्स