Join us

सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत रिया चक्रवर्तीनं हार्ट इमोजीसह शेअर केला खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2024 17:00 IST

 सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीदेखील सुशांतच्या आठवणीत भावूक झाली

आज दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा आज वाढदिवस आहे. सुशांतने खूप कमी वेळात बॉलीवूडमध्ये नाव कमावलं. छोट्या पडद्यापासून सुरू झालेला त्याचा प्रवास बॉलीवूडच्या सुपरहिट सिनेमापर्यंत येऊन पोहोचला.   सोशल मीडियावर चाहत्यांकडून सुशांतच्या आठवणी शेअर केल्या जात आहेत.   सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीदेखील सुशांतच्या आठवणीत भावूक झाली. तिने खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

रिया चक्रवर्तीनं सुशांतच्या जन्मदिवसानिमित्ताने एक स्टोरी शेअर केली आहे. तिने हार्ट ईमोजीसह शेअर केलेल्या फोटोमध्ये सुशांत आनंदात दिसत आहे. याशिवाय, रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीनेदेखील सुशांतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये शोविक आणि सुशांत एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. तसेच सुशांतची बहिण श्वेतानेही अभिनेत्याचा एक व्हिडीओ शेअर करत त्याला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती एकमेकांना डेट करत होते. यातच १४ जून २०२० रोजी सुशांतसिंह राजपूत मुंबईतील त्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता.त्याच्या निधनाच्या वृत्ताने चाहत्यांना आणि बॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला होता. सुशांतच्या मृत्यूनंतर एनसीबीने रिया आणि तिचा भाऊ शौविकला अटक केली होती. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी रियावर गंभीर आरोप लावण्यात आले होते. 

सुशांतसिंह राजपूतच्या कुटुंबीयांनी रियावर आरोप केले होते। कुटुंबीयांनी ड्रग्सचा दावा केल्याने रियालाही अनेक दिवस तुरुंगात राहावे लागले. यामुळे अभिनेत्रीला बराच काळ कामापासून दूर राहावे लागले होते. जवळपास महिनाभर तुरुंगात राहिल्यानंतर दोघांची जामिनावर सुटका झाली. बराच काळ गेल्यानंतर रियाने टेलिव्हिजनवर कमबॅक केलं. आता दोन वर्षांनंतर रियाने 'एमटीव्ही रोडीज'मधून पुनरागमन केले आहे.  एमटीव्ही रोडीजच्या 19 व्या सिझनमध्ये ती सहभागी झाली.  

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्तीसेलिब्रिटीबॉलिवूड