'बर्फी' फेम अभिनेत्री इलियाना डिक्रूज (Ileana Dcruz) पुन्हा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा आहेत. ऑगस्ट २०२३ मध्ये तिने मुलाला जन्म दिला. त्याचं नाव कोआ फिनिक्स डोलान असं ठेवण्यात आलं. इलियाना लग्नाआधीच प्रेग्नंट राहिल्याने खूप चर्चा झाली होती. मिखाइल डोलन असं इलियानाच्या नवऱ्याचं नाव आहे. सुरुवातीला इलियानाने नवऱ्याचं नाव आणि चेहरा लपवून ठेवला होता. लेकाच्या जन्मानंतर तिने याचा उलगडा केला. आता नुकतंच इलियानाने २०२४ वर्षाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती पुन्हा प्रेग्नंट झाल्याची झलक दिसत आहे.
२०२४ वर्षाला निरोप देताना इलियानाने व्हिडिओ शेअर केला. यामध्ये तिने जानेवारी ते डिसेंबर या प्रत्येक महिन्यातील काही खास व्हिडिओ शेअर केले. यात ऑक्टोबर महिन्याच्या व्हिडिओत ती प्रेग्नंसी किट दाखवताना दिसत आहे. काही सेकंदाची या झलकमध्ये इलियाना प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 'येणारं २०२५ हे वर्ष प्रेम, शांतता, जिव्हाळ्याने भरपूर असावं अशी आशा आहे.' असं कॅप्शन तिने दिलं आहे.
या व्हिडिओवर इलियाना दुसऱ्या बाळाला जन्म देणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 'सेकंड बेबी', 'ऑक्टोबर...पुन्हा अभिनंदन' अशा कमेंट्स दिसत आहेत. १ ऑगस्ट २०२३ रोजी कोआ फिनिक्स डोलनच्या बाळाचे स्वागत करणारी इलियानाने गेल्या वर्षी लग्न केले. रिपोर्टमध्ये, अभिनेत्रीच्या लग्नाची तारीख १३ मे २०२३ अशी नमूद करण्यात आली होती, जी इलियानाने तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा करण्याच्या चार आठवड्यांपूर्वी होती.