Join us

‘या’ विक्रम भट्टांना तुम्ही ओळखता का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 19:42 IST

अनेकदा अभिनेत्यांचे बॉडी ट्रांसफॉर्मेशन पाहून प्रेक्षकही अवाक् होता. आता या यादीत दिग्दर्शक विक्रम भट्ट यांचेही नाव जुळले आहे.

आपला चित्रपट, या चित्रपटातील आपली व्यक्तिरेखा अधिकाधिक वास्तववादी दिसावी, यासाठी अलीकडे कलाकार अथक परिश्रम घेतात. आमिर खानने ‘दंगल’साठी, सलमान खानने ‘सुल्तान’साठी, रणबीर कपूरने ‘संजू’साठी काय काय केले, हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. अनेकदा अभिनेत्यांचे बॉडी ट्रांसफॉर्मेशन पाहून प्रेक्षकही अवाक् होता. आता या यादीत दिग्दर्शक विक्रम भट्ट यांचेही नाव जुळले आहे. होय, आज विक्रम भट्ट यांनी सोशल मीडियावर स्वत:चा असा काही फोटो शेअर केला की, लोकांना स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास होईना. काळ्या रंगांचा टी-शर्ट आणि मेकअप तर असे की, कुणी त्यांना सहजी ओळखूही शकणार नाही. आजपर्यंत विक्रम भट्ट यांना आपण पांढरे केस अन् पांढरी दाढी अशाच वेशात पाहिले आहे. आज मात्र विक्रम भट्ट काळे केस, काळी दाढी अशा हटके लूकमध्ये दिसले.

आता विक्रम भट्ट यांचे हे नवे लूक पाहून तुम्ही बुचकळ्यात पडला असाल तर आम्ही सांगू इच्छितो की, त्यांचे हे नवे लूक दुसऱ्या कशासाठी नसून एका भूमिकेच्या तयारीसाठी आहे. होय, लवकरच, ‘जिंदाबाद’ या वेबसीरिजमध्ये विक्रम अभिनय करताना दिसणार आहेत. यात तेसनाया ईरानीसोबत स्क्रिन शेअर करतील. त्यांचा नवा लूक याच वेबसीरिजसाठी आहे. या थ्रीलर वेबसीरिजमध्ये पंकज धीर, सना खान, अनिरूद्ध देव यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ही वेबसीरिज यायला अद्याप वेळ आहे. तोपर्यंत विक्रम भट्ट यांचे हे नवे रूप तुम्हाला कसे वाटले, ते सांगायला विसरू नका.

१९८२ सालापासून बॉलिवूडमध्ये कार्यरत असलेल्या भट्ट यांनी मुकुल आनंद, शेखर कपूर, महेश भट्ट इत्यादी आघाडीच्या दिग्दर्शकांच्या सहाय्यकाचे काम केले आहे. १९९२ साली त्यांनी स्वत: प्रमुख दिग्दर्शक बनून जानम या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. तेव्हापासून त्यांनी अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांना आजवर अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत.

 

टॅग्स :विक्रम भट