रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चेन्नईच्या मैदानावर महामुकाबला झाला. भारताने ऑस्ट्रेलियाचा 201 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने सुरुवातीलाच भारताच्या तीन विकेट घेतल्या. यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल मैदानात उतरले आणि बाजी पलटवली. केएल राहुलने षटकार मारत भारताला विजय मिळवून दिला. दमदार खेळीनंतर देशभरातील क्रिकेटप्रेमींनी राहुलचं कौतुक केलं. राहुलची पत्नी आणि अभिनेत्री अथिया शेट्टीनेही खास पोस्ट केली.
अथिया शेट्टीने पती राहुलचं कौतुक केलं. राहुलचा व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलं की, "सर्वोत्तम व्यक्ती". तसेच तिने राहुल आणि विराटची आणखी एक पोस्ट शेअर करून क्रिकेट सामन्यातील विजयाबद्दल आनंद व्यक्त केला.
अथियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे, तर तिने 2015 मध्ये 'हिरो' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती 2017 मध्ये 'मुबारकां' चित्रपटात दिसली. अथिया शेवटची 2019 मध्ये 'मोतीचूर चकनाचूर'मध्ये दिसली होती. राहुल आणि अथिया शेट्टी २३ जानेवारी रोजी विवाहबंधनात अडकले. लग्नापूर्वी अथिया-राहुल तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते.