Join us
Daily Top 2Weekly Top 5

'पहाटे ४ पर्यंत मी दारु प्यायचो, पत्नी अन् मुले सुद्धा..'; जॉनी लिव्हर जडलेलं व्यसन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 10:28 IST

Johnny lever: एका मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या दारुच्या व्यसनाबद्दल भाष्य केलं आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि विनोदवीर जॉनी लिव्हर (Johnny lever) यांनी कलाविश्वात त्यांचं एक वेगळं असं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे त्यांची कायम नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत असते. सध्या सोशल मीडियावर त्यांची एक मुलाखत चर्चिली जात आहे.  या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या दारुच्या व्यसनाबद्दल भाष्य केलं आहे.

जॉनी लिव्हर यांनी 'इलाहाबादिया'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. यात ते एकेकाळी दारुच्या प्रचंड आहारी गेले होते, असं सांगितलं.

''एक काळ असा होता जेव्हा मी दारुच्या प्रचंड आहारी गेलो होतो. मित्रांसोबत मी मुंबईच्या चौपाटीवर रात्रभर दारु पित बसायचो. काही वेळा तर दारु पिण्याच्या नादात पहाटेचे ४ ही वाजून जायचे. ज्यावेळी चौपाटीवर पोलिस गस्त घालायला यायचे. तेव्हा ते मला ओळखायचे'', असं जॉनी लिव्हर म्हणाले. 

पुढे ते म्हणाले, ''दिवसभर शुटिंग, रात्री लाइव्ह शो या सगळ्यामुळे मी इतका थकून जायचो की त्यातूनच मला दारुचं व्यसन जडलं. शो संपल्यानंतर मला माझं शरीर मृतदेहासारखं वाटायचं. पण एक गोष्ट आहे मी कधीच दारु पिऊन स्टेजवर गेलो नाही. मी माझ्या प्रोफेशनलिझ्मसोबत कधीच तडजोड केली नाही.''

दरम्यान, ''माझ्या दारुच्या व्यसनामुळे पत्नी, मुले सगळेच त्रस्त झाले होते. घरचं वातावरण दुषित होत होतं. ज्यावेळी ही गोष्ट माझ्या लक्षात आली. त्यावेळी मी माझ्या मनाची समजूत काढली आणि या व्यसनापासून दूर होण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला कठीण गेलं. मात्र, मी त्यावर मात केली. आज २४ वर्ष झाले मी दारुच्या व्यसनापासून लांब आहे.''

English
हिंदी सारांश
Web Title : Johnny Lever's Alcohol Addiction: 'I Used to Drink Till 4 AM'

Web Summary : Johnny Lever revealed his past alcohol addiction, recalling drinking until 4 AM with friends. His family suffered, prompting him to quit. He's now been sober for 24 years, never compromising his professionalism by drinking before shows.
टॅग्स :जॉनी लिव्हरसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमा