Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मी तर फक्त हसले...' गोल्ड डिगर म्हणणाऱ्यांना सुष्मिता सेनचं सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2023 12:06 IST

सुष्मिता सेनने मुलाखतीत अखेर सत्य सांगितलंच

अभिनेत्री सुष्मिता सेनने (Sushmita sen) नुकत्याच रिलीज झालेल्या 'ताली' सीरिजमध्ये ट्रांसजेंडर गौरी सावंतची भूमिका साकारली. सध्या सुष्मिताचं तिच्या अभिनयासाठी खूप कौतुक होत आहे. याआधीही 'आर्या' ही तिची सीरिज गाजली होती.  मात्र सुष्मिता मधल्या काळात तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आली होती. गेल्या वर्षी आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदींनी सुष्मितासोबतचे वैयक्तिक फोटो शेअर करत त्यांच्या अफेअरचा खुलासा केला होता तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. तर त्याआधी रोहमन शॉसोबत ती लिव्ह इनमध्ये राहत होती. ललित मोदींनी केलेल्या पोस्टनंतर सुष्मिताला खूप ट्रोल केले गेले अगदी 'गोल्ड डिगर'ही म्हटले गेले. नंतर तिने एका पोस्टमधून त्यावर प्रतिक्रिया दिली होती. आता नुकतंच एका मुलाखतीत सुश्मिताने सडेतोड उत्तर दिलं आहे.

सुष्मिता म्हणाली, 'मी पोस्ट लिहिली कारण मला त्यावर हसायचं होतं. मला त्याचं काहीच दु:ख नाही. ती पोस्ट केवळ एक मजा होती. कारण तुम्ही कोणा एका महिलेला गोल्ड डिगर म्हणता आणि तिच्यावर स्टोरी बनवता तेव्हा तुमच्यात काय फरक राहिला.'

ती पुढे म्हणाली, 'जेव्हा चांगले लोक शांत बसतात तेव्हा वाईट लोकांची हिंमत अजूनच वाढते. मी अनेकदा असं होताना पाहिलं आहे. आपल्याला वाटतं की अशा गोष्टींवर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही पण मला लोकांना हे सांगणं गरजेचं वाटतं की मी त्यांच्या बोलण्यावर हसते. पिढ्यानपिढ्या बदलल्या पण लोकांची नैतिकता बदलली नाही.'

१५ ऑगस्ट रोजी सुष्मिताची 'ताली' ही वेबसिरीज प्रदर्शित झाली. सध्या सीरिजला चांगला प्रतिसाद मिळतोय. रवी जाधव यांनी सिरीज दिग्दर्शित केली असून अनेक मराठी कलाकार यामध्ये मुख्य भूमिकेत आहेत.

टॅग्स :सुश्मिता सेनललित मोदीरिलेशनशिपसोशल मीडियाबॉलिवूड