Join us
Daily Top 2Weekly Top 5

"माझे वडील पत्रकार होते, गँगस्टर नाही..."; शाहिद कपूरच्या 'ओ रोमियो' सिनेमावर हुसैन उस्ताराच्या मुलीने घेतला आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 14:51 IST

अंडरवर्ल्डशी संबंधित समजल्या जाणाऱ्या हुसेन उस्तारा (Hussain Ustara) यांच्या मुलीने ओ रोमियो या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करत न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

चित्रपटसृष्टीत वास्तववादी कथांवर आधारित चित्रपट बनवण्याचा कल नेहमीच राहिला आहे, मात्र अनेकदा हे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडतात. असाच एक नवा वाद 'ओ रोमियो' या आगामी चित्रपटाबाबत निर्माण झाला आहे. अंडरवर्ल्डशी संबंधित समजल्या जाणाऱ्या हुसेन उस्तारा (Hussain Ustara) यांच्या मुलीने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करत न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

काय आहे नेमका वाद? 'ओ रोमियो' हा चित्रपट हुसेन उस्तारा यांच्या जीवनावर आधारित असल्याचं बोललं जात आहे. मात्र, हुसेन उस्तारा यांची मुलगी झोया उस्तारा हिने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. झोयाने न्यायालयात याचिका दाखल केली असून, चित्रपटात तिच्या वडिलांची प्रतिमा 'गँगस्टर' म्हणून चुकीच्या पद्धतीने रंगवण्यात आल्याचा आरोप केला आहे.

मुलीचा दावा झोयाने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, "माझे वडील पत्रकार होते, गँगस्टर नाही. या चित्रपटात त्यांच्या आयुष्यातील घटनांचा विपर्यास करण्यात आला आहे. त्यांना गुन्हेगारी जगताशी संबंधित दाखवून त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न निर्मात्यांनी केला आहे." झोयाने पुढे असेही स्पष्ट केले की, निर्मात्यांनी हा चित्रपट बनवण्यासाठी तिच्या कुटुंबाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही.

हुसेन उस्तारा यांच्या कुटुंबाने न्यायालयाकडे विनंती केली आहे की, जोपर्यंत चित्रपटातून आक्षेपार्ह दृश्ये हटवली जात नाहीत किंवा कथेत योग्य बदल केले जात नाहीत, तोपर्यंत या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यात यावी. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, अशा चित्रपटामुळे कुटुंबाच्या सामाजिक प्रतिष्ठेवर वाईट परिणाम होत आहे. 'ओ रोमियो' हा चित्रपट मुंबईच्या अंडरवर्ल्डच्या पार्श्वभूमीवर आधारित असून, यात शाहिद कपूर, तृप्ती डिमरी, फरीदा जलाल आणि नाना पाटेकर यांची प्रमुख भूमिका आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shahid Kapoor's 'O Romeo' Faces Legal Hurdle; Family Claims Defamation.

Web Summary : Hussain Ustara's daughter seeks a ban on 'O Romeo,' alleging her father, a journalist, is wrongly portrayed as a gangster. The family claims the film, starring Shahid Kapoor, defames their reputation and was made without their consent. They demand changes or a stay on release.
टॅग्स :शाहिद कपूरतृप्ती डिमरीफरिदा जलालबॉलिवूडनाना पाटेकर