Join us

'जलेबीसारखी हेअर स्टाइल...'; हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझादला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 18:17 IST

अभिनेता हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद ही नेहमीच चर्चेत असते

सबा आजाद सध्या बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय आहे. याला कारणही तसंच आहे. हँडसम अभिनेता हृतिक रोशनसोबत ती रिलेशनशिपमध्ये आहे त्यांचं अफेअर बीटाऊनमधला हॉट टॉपिक आहे. नुकतेच दोघांनी झोया अख्तरचा चित्रपट 'द आर्चीज'च्या ग्रँड प्रीमियरला हजेरी लावली. यावेळी सबाच्या लुकने लक्ष वेधलं.  यावेळी नेटकरी तिला हेअरस्टाईलवरुन ट्रोल करत आहेत. 

'द आर्चीज'च्या प्रीमियरला सबा आझाद फ्लोरल प्रिंटेड मिडी स्कर्ट आणि मॅचिंग टॉपमध्ये दिसली. यावर तिने हाय हिल्स घातल्या होत्या. ड्रेससोबतच सबाची हेअर स्टाइलही विशेष होती. तिने काही केस पोनीटेलमध्ये बांधले आणि कपाळावर तिचे पुढचे केस अनोख्या शैलीत स्टाईल केले होते. अभिनेत्रीची ही हेअरस्टाईल पाहून लोक तिला खूप ट्रोल करत आहेत. 

एका यूजरने लिहिले की, 'का म्हणून अशी हेअर स्टाईल केली असावी'. तर आणखी एका यूजरने लिहिले की, 'ही जलेबीसारखे केस असलेली मुलगी सर्वात देखण्या मुलाची मैत्रीण आहे'. तर तिसर्‍याने लिहिले, डोक्यावर जलेबी का बनवली आहे?'. तर आणखी एकाने लिहले की, 'मला माहित नाही की तिच्या केसांच्या स्टाईलमध्ये काय चूक आहे, हे खूप विचित्र दिसत आहे'.

हृतिक आणि सबाच्या रिलेशनशिपच्या चर्चा गेल्या वर्षी सुरु झाल्या. तेव्हापासून सबा आजाद प्रकाशझोतात आली. दोघंही अर्जेंटिना येथे सुट्टी एन्जॉय करुन आले. त्यांचे रोमँटिक फोटो समोर आले. ते रिलेशनशिप कधीच लपवताना दिसले नाहीत तर खुल्लमखुल्ला मान्य करत आहेत. त्यांना अनेकदा डेटवर, फॅमिली फंक्शनमध्ये सोबत पाहिलं गेलं आहे. दोघंही लग्न करणार असल्याच्याही चर्चा आहेत. 

टॅग्स :हृतिक रोशनरिलेशनशिपसेलिब्रिटी