War 2 Teaser Released : साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर (Jr Ntr ) आणि बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन (Hrithik Roshan) यांच्या फॅन्ससाठी खूशखबर आहे. त्यांच्या 'वॉर २' सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. चाहते याच क्षणाची वाट पहात होते. ज्युनिअर एनटीआरच्या चाहत्यांना अभिनेत्याच्या वाढदिवसाचं खास गिफ्ट मिळालं आहे. सिनेमाच्या टीझरमध्ये दोन्ही अभिनेत्यांचा एकूण अंदाज पाहून तुम्ही थक्कच व्हाल. एकदम खतरनाक लूक आहे. हा टीझर प्रदर्शित होताच, ट्रेंड करतोय.
'वॉर २'च्या टीझरमध्ये अॅक्शन, थरार आणि स्टार पॉवर पाहायला मिळतेय. याआधी २०१९ मध्ये आलेल्या 'वॉर' या चित्रपटात ऋतिक रोशनने रॉ एजंट कबीरची भूमिका साकारली होती. 'वॉर २' मध्ये ऋतिक पुन्हा एकदा त्याच भूमिकेत झळकणार आहे. विशेष म्हणजे, ज्युनिअर एनटीआर या चित्रपटातून हिंदी सिनेमात पदार्पण करत आहेत. तर कियारा अडवाणी मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत आहे.
'वॉर २' मध्ये ऋतिक आणि ज्युनिअर एनटीआर यांची टक्कर प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्यानं चित्रपटाबद्दल उत्सुकता आणखी वाढली आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अयान मुखर्जीने सांभाळली आहे. हा चित्रपट येत्या १४ ऑगस्ट २०२५ रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे.
'वॉर २' ही YRF स्पाय युनिव्हर्समधील सहावी फिल्म आहे. या फ्रँचायझीमधील 'एक था टायगर', 'टायगर जिंदा है', 'वॉर', 'पठाण', आणि 'टायगर ३' हे सर्व चित्रपट सुपरहिट ठरले आहेत.