Join us

Hrithik Roshan, Saba Azad: हृतिक रोशन-सबा आझादच्या लग्नाला नोव्हेंबरचा मुहूर्त? व्हायरल होतंय ते ट्वीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 11:50 IST

Hrithik Roshan, Saba Azad: होय, सोशल मीडियावर एक ट्वीट व्हायरल झालंय. यानंतर हृतिक रोशन, सबा आझाद दोघांच्या लग्नाच्या चर्चांना ऊत आला आहे.

Hrithik Roshan Saba Azad: हृतिक रोशन-सबा आझादच्या प्रेमात आकंठ बुडाला आहे. दोघांच्याही लव्ह लाईफची चर्चा सध्या जोरात आहे.  गेला काही महिन्यांपासून हृतिक सबाला डेट करतोय. अद्याप दोघांनीही आपल्या नात्याची अधिकृत कबुली दिलेली नाही. पण म्हणून हे नातं कुणापासून लपून राहिलेलं नाही. दोघंही अनेकदा हातात हात घालून एकत्र फिरताना दिसतात. आता कदाचित हे जोडपं लग्नबंधनात अडकणार आहे. होय, सोशल मीडियावर एक ट्वीट  व्हायरल झालंय. यानंतर दोघांच्या लग्नाच्या चर्चांना ऊत आला आहे.एका व्हेरिफाईड हँडलवरचं एक ट्वीट व्हायरल झालं आहे. ऋतिक येत्या नोव्हेंबरमध्ये सबासोबत लग्न करणार असल्याचं या ट्विटमध्ये म्हटलं आहे. अर्थात या ट्वीटला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. हृतिक व सबा या दोघांपैकी कुणीही यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

याआधीही हृतिक व सबाच्या लग्नाची चर्चा होती. हृतिकच्या कुटुंबीयांनी कधीच दोघांच्या नात्याला हिरवा कंदील दिला आहे. सबा ही हृतिकसाठी एकदम बेस्ट आहे, असं हृतिकच्या कुटुंबीयांचं मत आहे. हृतिक व सबाने करण जोहरच्या ५० व्या वाढदिवसाच्या पार्टीत आपलं नातं ऑफिशिअल केलं होतं. दोघंही एकत्र या पार्टीला पोहोचले होते. संपूर्ण पार्टीत हे कपल एकमेकांच्या हात हात घालून फिरत होतं.

गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये हृतिक व सबा दोघं पहिल्यांदा एकत्र दिसले होते. सबा आझाद एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. 1 नोव्हेंबर 1990 रोजी जन्मलेली आणि दिल्लीत लहानाची मोठी झालेल्या सबाने थिएटर आर्टिस्ट म्हणून अ‍ॅक्टिंग करिअरला सुरूवात केली. यानंतर ती चित्रपटांकडे वळली. 2008 साली ‘दिल कबड्डी’ या सिनेमातून तिचा डेब्यू झाला. यात ती राहुल बोससोबत स्क्रिन शेअर करताना दिसली होती. पण तिला ओळख दिली ती 2011 साली रिलीज ‘मुझसे फ्रेन्डशिप करोगे’ या सिनेमाने. यात तिच्या अपोझिट साकिब सलीम दिसला होता. त्याआधी सबाने अनेक शॉर्ट फिल्म्समध्ये काम केलं आहे. 2021 साली म्हणजे गतवर्षी ती ‘फील्स लाइक इश्क’ या सिनेमात दिसली होती.

टॅग्स :हृतिक रोशनबॉलिवूड