Join us
Daily Top 2Weekly Top 5

गलफ्रेंडबरोबर लिपलॉक अन्...; हृतिकच्या वाढदिवशी सबाने शेअर केला रोमँटिक व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 18:09 IST

हृतिकची गर्लफ्रेंड सबा आझादनेही खास व्हिडिओ शेअर करत अभिनेत्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचा आज ५०वा वाढदिवस आहे. अभिनयाबरोबरच डान्सिंग आणि फिटनेससाठी ओळखल्या जाणाऱ्या हृतिकची आजही तरुणाईमध्ये क्रेझ आहे. त्याच्या चाहत्यांकडून वाढदिवशी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे. हृतिकची गर्लफ्रेंड सबा आझादनेही खास व्हिडिओ शेअर करत अभिनेत्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 

सबाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन हृतिकबरोबरचा एक रोमँटिक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत हृतिक सबा आझादला लिपलॉक करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत सबाने "सूर्याभोवती ५० प्रदक्षिणांसारखी तुझी जर्नीही सुंदर आहे. हॅपी बर्थडे लव्ह. तू माझ्या आयुष्यातील प्रकाश आहेस," असं म्हटलं आहे. सबाच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी हृतिकला वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या आहेत. 

हृतिकने २००० साली सुझैन खानशी लग्न केलं होतं. १४ वर्षांच्या सुखी संसारानंतर घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांना दोन मुलंही आहेत. सुझैनला घटस्फोट दिल्यानंतर हृतिक आता सबाला डेट करत आहे. अनेक कार्यक्रम आणि पार्टीमध्येही ते दोघे एकत्र दिसतात. 

टॅग्स :हृतिक रोशनसेलिब्रिटीसिनेमा