हृतिक रोशन (Hrithik Roshan), कियारा अडवाणी(Kiara Advani) आणि ज्युनिअर एनटीआर यांच्या 'वॉर २' (War 2) चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. सिनेमात हृतिक आणि ज्युनिअर एनटीआरचा धाँसू अवतार दुसत आहे. तर कियाराही अॅक्शन मोडमध्ये आहे. ट्रेलर पाहून सिनेमाची उत्सुकता आणखी ताणली आहे. याआधी सिनेमाचा फर्स्ट लूक आला होता त्यात कियाराने बिकिनी लूकमधून लक्ष वेधून घेतलं होतं. तर आता ट्रेलरमध्ये कियारा आणि हृतिकचा लिपलॉक सीनही दिसत आहे. कियारासोबत रोमान्स करणारा हृतिक तिच्याहून किती मोठा आहे माहितीये का?
अयान मुखर्जी दिग्दर्शित 'वॉर २'च्या अॅक्शन पॅक्ड ट्रेलरचं सध्या कौतुक होत आहे. प्रेक्षकांना सिनेमाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. तगडी स्टारकास्ट, अॅक्शन सीन्स यामुळे सिनेमाची चर्चा आहे. ट्रेलरमध्ये हृतिक आणि कियारामध्ये रोमँटिक अँगल दाखवण्यात आला आहे. तर पुढे दोघे एकमेकांसोबत भिडतानाही दिसतात. ट्रेलरमधून हृतिक आणि कियाराची केमिस्ट्री झळकत आहे. हृतिक आज ५१ वर्षांचा आहे तर कियारा ३३ वर्षांची आई. दोघांमध्ये १८ वर्षांचं अंतर आहे. पण कमी वयाच्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करण्याची हृतिकची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याने मृणाल ठाकुर, बार्बरा मोरी यांच्यासोबतही रोमँटिक सीन केले आहेत.
कियारा अडवाणी काही दिवसांपूर्वी आई झाली आहे. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. अयान मुखर्जी दिग्दर्शित वॉर २' हा YRF च्या स्पाय युनिव्हर्स मधील एक महत्त्वाचा सिनेमा आहे. 'वॉर २' हा सिनेमा १४ ऑगस्ट रोजी हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये जगभरातल्या चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात कियारा अडवाणी, आशुतोष राणा सुद्धा झळकत आहेत. याशिवाय शर्वरी वाघ, आलिया भट या सिनेमात कॅमिओ करण्याची शक्यता आहे.