Join us

किती गोड! अभिनेत्री सोनम कपूरने पहिल्यांदाच दाखवला मुलाचा चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2023 19:29 IST

आतापर्यंत सोनमने लेकाचे फोटो दाखवले नव्हते. कधी इमोजी लावून किंवा चेहरा लपवून तिने फोटो शेअर केले होते.

बॉलिवूडची फॅशनिस्टा सोनम कपूर आणि उद्याजक आनंद अहुजा यांचं २०१८ साली लग्न झालं. त्या दोघांना मागच्याच वर्षी पुत्ररत्न झालं. सोनम कपूरचा 'वायू' कसा दिसतो, याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. चाहत्यांची प्रतिक्षा संपली असून अखेर सोनमने लेकाचा चेहरा दाखवला आहे. आतापर्यंत सोनमने लेकाचे फोटो दाखवले नव्हते. कधी इमोजी लावून किंवा चेहरा लपवून तिने फोटो शेअर केले होते. पण आज पहिल्यांदाच तिने वायूचा फोटो जगासमोर आणला आहे.

सोनम कपूर हिने दिर अनंत आहूजाला पोस्ट शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिने लिहलं की,  'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. खूप सारं प्रेम... तुझ्याकडून वायूदेखील दयाळूपणा आणि सहानुभूती शिकेल'. सोनमने शेअर केलेल्या फोटोत अनंतच्या हातात पुस्तक आहे. तर सोनम कपूरचा मुलगा वायू हा त्यांच्या बसल्याचे दिसतंय. या फोटोत वायू खूप गोड दिसतोय.

नवरात्रीच्या मुहुर्तावर सोनमने हे नवीन घर घेतलंय. सोनम आणि तिचा मुलगा वायू यांचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. सध्या ती मोठ्या पडद्यापासून दूर राहत लेकाचं संगोपन करण्यात व्यस्त आहे. नुकतंच तिने मुंबईतील मुखर्जी कुटुंबाच्या दुर्गा पूजेला हजेरी लावली. यावेळी राणी मुखर्जीसोबत गप्पा मारतानाचा तिचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सोनमने पुन्हा सिनेमात यावं यासाठी चाहते नेहमीच आग्रही असतात.  

सोनम कपूरने अनेक हिट बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.  तिने 2007 मध्ये रणबीर कपूरसोबत संजय लीला भन्साळीच्या सावरिया या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.  'रांझना', 'नीरजा', 'प्रेम रतन धन पायो' आणि इतर चित्रपटातून आपला ठसा उमटवला आहे. आता ती 'बॅटल फॉर बिटोरा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  पुढच्या वर्षीपासून या चित्रपटाचे काम सुरू होणार आहे. हा चित्रपट अनुजा चौहानच्या कादंबरीवर आधारित आहे.

टॅग्स :सोनम कपूरबॉलिवूडसेलिब्रिटी