बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने वेगवेगळ्या भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. तसेच ती बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येते. तिची स्टाईल स्टेटमेंट तिच्या चाहत्यांना खूप भावते. ती बऱ्याचदा डिझायनर आउटफिट्सना प्राधान्य देताना दिसते. मात्र कधी कधी कलाकारांचे स्टाईल स्टेटमेंट लोकांना खटकणे साहजिक आहे. असेच काहीसे दीपिका पादुकोण सोबतही झाले होते. तिचा सेक्सी ब्लाउज पाहून लोक भडकले होते आणि तिला चांगलेच ट्रोल केले होते.
दीपिका पादुकोणला सुंदर दिसणे त्यावेळी चांगलेच महागात पडले होते. ब्लॅक रंगाची सेक्सी साडी परिधान करून एका इव्हेंटला गेली होती. खरेतर हे सारं प्रकरण आहे २०१७ सालचे. जीक्यू फॅशन नाइट इव्हेंटमधील. या इव्हेंटसाठी दीपिकाने क्लासिक साडी निवडली होती.
ब्लॅक अँड गोल्डन साडीवर दीपिकाने खूप बोल्ड ब्लाउज घातला होता. जो बॉडी एक्स्पोझ करत होता. तिच्या या ब्लाउजवरून तिला खूप ट्रोल करण्यात आले होते. तिचा पेहराव पाहून लोकांनी मस्करीत तिला पेन्सिलचे साल म्हटले. काही युजर्सने तिच्या ब्लाउजला घटिया म्हटले. तिला दिखावा केल्यामुळे तिला बेशरम म्हटले. इतकेच नाही तर एका युजरने दीपिकाला साडीची वाट लावली असेही म्हटले. तसेच काहींनी दीपिकावर बॉडी एक्सपोझ केल्याचे आरोप केले होते.