Join us
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयातून बाहेर आल्यावर आता कसा आहे गोविंदा? पत्नी सुनिता आहुजाने दिली हेल्थ अपडेट, म्हणाली-

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 16:00 IST

गोविंदाची प्रकृती बरी नव्हती. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु आता तो कसा आहे, याविषयी त्याच्या पत्नीने खुलासा केलाय.

अभिनेता गोविंदाला काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रात्री अचानक बेशुद्ध झाल्याने गोविंदाला त्याच्या मित्राने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात केलं होतं. परंतु त्याच दिवशी सकाळी गोविंदाला डिस्चार्ज देण्यात आला. आता गोविंदाची तब्येत कशी आहे? याविषयी त्याची पत्नी सुनिता आहुजाने सांगितलंय. याशिवाय गोविंदाला नेमकं काय झालं होतं, याविषयीही खुलासा केलाय. काय म्हणाली सुनिता?

सुनिता अहुजाने दिली गोविंदाची हेल्थ अपडेट

सुनिता म्हणाली की, आता गोविंदा एकदम फिट अँड फाईन आहे. सुनिताने लेटेस्ट व्लॉगच्या माध्यमातून हा खुलासा केलाय. ती म्हणाली, ''गोविंदा आता संपूर्णपणे तंदुरुस्त आहे. तो आता त्याचा नवा सिनेमा दुनियादारीच्या तयारीत व्यस्त आहे. त्याचीच तयारी करताना त्याला चक्कर आली आणि तो बेशुद्ध झाला. तो आता ठीक आहे. काळजी करण्याचं कारण नाही.'' अशाप्रकारे सुनिता यांनी गोविंदाची हेल्थ अपडेट दिली. 

गोविंदा रुग्णालयातून बाहेर आल्यावर काय म्हणालेला?

"मी ठीक आहे...तुम्हा सगळ्यांचा मी आभारी आहे", असं म्हणत गोविंदाने रुग्णालयातून बाहेर आल्यावर चाहत्यांचे आभार मानले. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर गोविंदाने मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी म्हणाला, "मी खूप व्यायाम केल्याने मला चक्कर आली. योगा-प्राणायम चांगलं आहे. पण, खूप व्यायाम ही गोष्ट कठीण आहे. मी माझी पर्सनालिटी सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. डॉक्टरांनी मला औषधं दिली आहेत", अशी प्रतिक्रिया गोविंदाने दिली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Govinda's Health Update: Wife Sunita Ahuja Reveals His Condition Post-Hospital

Web Summary : Govinda is now fit after a hospital stay due to dizziness. His wife, Sunita Ahuja, shared he's preparing for his new film. Govinda thanked fans, mentioning over-exercising caused the issue, and he is now on medication.
टॅग्स :गोविंदाबॉलिवूडआरोग्यहेल्थ टिप्स