Join us

हनी सिंग पुन्हा अडचणीत, गायकाविरोधात मारहाण आणि अपहरणाची तक्रार, काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 16:06 IST

हनी सिंग आणि त्याच्या साथीदारांनी अपहरण करून डांबून ठेवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 गायक यो यो हनी सिंग  (Honey Singh) त्याच्या नवीन अल्बम हनी 3.0 साठी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. हनी सिंग सतत नवीन अल्बमचे प्रमोशन करत असून अनेक मुलाखती देत ​​आहे. हनी सिंगच्या नवीन अल्बमच्या प्रमोशन दरम्यान, नुकतीच एका गायकाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, हनी सिंग आणि त्याच्या साथीदारांनी अपहरण करून डांबून ठेवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

एका प्रसिद्ध इव्हेंट कंपनीचे मालक विवेक रवी रमण यांनी हनी सिंग विरुद्ध अपहरण, प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. रिपोर्टनुसार, हनी सिंगवर आरोप करताना असे म्हटले आहे की, मुंबईच्या बीकेसीमध्ये हनी सिंग कॉन्ट्रोव्हर्सीचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, जिथे पैशांबाबत काही गडबड झाली आणि त्यानंतर विवेक यांनी हा कार्यक्रम रद्द केला. गायक सिंग आणि त्याचे कर्मचारी कार्यक्रम रद्द केल्यामुळे संतप्त झाले आणि त्यांनी रमण यांच्यावर हल्ला केला.

“हनी सिंग आणि त्याचे कर्मचारी रोहित छाबरा, अक्षत जैस्वाल, राहुल जैस्वाल, इंद्रजित सुनील, निखिल, अरविंदर क्लेर, अरुण कुमार आणि अक्षय मेहरा यांनी माझ्यावर हल्ला केला, अपहरण केले आणि धमकावले.  अशी तक्रार रमण यांनी केली आहे. अद्याप पोलिसांनी हनी सिंग विरोधात गुन्हा दाखल केला नाही ते या प्रकरणाची सविस्तर चौकशी करत आहेत. 

टॅग्स :हनी सिंहगुन्हेगारी