Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध हॉलिवूड स्टारने व्यक्त केली शाहरुख खानसोबत काम करण्याची इच्छा; म्हणाला, 'त्याने मला...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 08:44 IST

सलमान खान आणि बिग बींसोबतही झालेली प्रोजेक्ट संदर्भात चर्चा

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची जगभरात क्रेझ आहे. करोडो चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी वेडे असतात. चाहतेच नाही तर हॉलिवूड स्टारही शाहरुखचं कौतुक करतात. काही दिवसांपूर्वी हॉलिवूड अभिनेत्री सोफी टर्नरनेही ती शाहरुख खानची चाहती असल्याचं म्हटलं होतं. तर आता हॉलिवूड स्टार विल स्मिथने थेट शाहरुखसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

गल्फ न्यूजला दिलेल्या मुलाखतीत विल स्मिथ म्हणाला, 'शाहरुखने मला त्याच्या एखाद्या फिल्ममध्ये घ्यावं अशी माझी इच्छा आहे.' यानंतर त्याने शाहरुखची विचारपूसही केली. नंतर तो म्हणाला, "यापूर्वी एकदा सलमान खान आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत सिनेमाच्या प्रोजेक्ट संदर्भात चर्चा झाली होती. मी समलानशी बोललो होतो. आम्ही अनेक गोष्टींवर चर्चा केली. मी बिग बींसोबत काहीतरी काम करण्याच्या प्रयत्नात होतो. ते मला म्हणाले होते की मी बिग डब्ल्यू बनू शकतो, यामुळे आमचं टायटलही शेअर झालं असतं. काही वर्ष मध्ये मध्ये चर्चा झाली पण काहीच फायनल होऊ शकलं नाही."

विल स्मिथचे भारतातही चाहते आहेत. विल स्मिथने अनेक सिनेमांनी हॉलिवूडमध्ये धमाल केली आहे. याशिवाय तो एका थप्पड कांडमुळेही चर्चेत आला होता. २०२२ च्या ऑस्कर अवॉर्डवेळी त्याने स्टेजवर जात कॉमेडियन क्रिस रॉकच्या कानाखाली वाजवली होती. त्याला हिंदी सिनेमात पाहण्यासाठी त्याचे भारतातील चाहते नक्कीच उत्सुक आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Will Smith Wants to Work with Shah Rukh Khan

Web Summary : Hollywood star Will Smith expressed his desire to work with Shah Rukh Khan in a Bollywood film. He previously discussed potential projects with Salman Khan and Amitabh Bachchan but nothing materialized. Smith's Indian fans are eager to see him in Hindi cinema.
टॅग्स :शाहरुख खानहॉलिवूडबॉलिवूड